अडीच कोटींच्या फसवणुकी प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेने आवळल्या कर्नाटकातून आरोपीच्या मुस्क्या
जालना उद्योगासाठी अडीचशे कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून हे कर्ज देण्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून अडीच कोटी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालना येथील व्यावसायिक संजय मनोहर शिनगारे यांनी यासंदर्भात चंदंनझीरा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 29 मे 2024 रोजी तक्रार दिली होती.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, संजय मोहन शिंगारे हे एका भागीदारासोबत श्री .बालाजी उद्योग नावाची खाद्यतेल निर्मितीची कंपनी चालवतात. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करावे लागते आणि त्यासाठी रोख रकमेची नेहमीच गरज पडते. वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ते हा निधी उभा करतात.त्यांची व्यवसायाने सीए असलेल्या मुंबई येथील रहिवासी रुपेश पारेख यांची ओळख झाली आणि त्यांनी बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतो म्हणून श्री. साई कन्सल्टंट चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे नाव सुचवले. त्यासोबत या कंपनीचे जबाबदार अधिकारी म्हणून रोशन सालदाना, राहणार बैजल चर्च, इवानी हाऊस, सलदाना कंपाऊंड, मेंगलोर जिल्हा मेंगलोर कर्नाटक यांच्यासोबत बोलणी करून देतो म्हणून चित्रदुर्ग कर्नाटक येथे हे दोघेजण गेले. त्यावेळी रोशन सालदाना यांनी अडीचशे कोटी रुपये तीन टक्का प्रति वर्षे व्याज दराने देण्याचे आश्वासन दिले आणि कंपनीच्या आणखी काही अधिकाऱ्यांची ओळख करून दिली.तेंव्हा रोशन सालदाना हे राजकीय पुढार्यांचे नातेवाईक असून ते वेगवेगळ्या कंपन्यांना अर्थ पुरवठा करतात असे सांगण्यात आल्यामुळे संजय शिनगारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर रोशन सालदाना हा मर्सिडीज कार क्रमांक के ए 19 एम जे 80 50 घेऊन संजय शिनगारे यांच्या श्री बालाजी उद्योग नावाच्या गुंडेवाडी शिवारात असलेल्या कंपनीत येऊन भेटला . त्यावेळी कर्ज देण्यासाठी दोन टक्के प्रोसेसिंग फी द्यावी लागेल असे सांगितले ,चर्चेअंती ही फी एक टक्का ठरली आणि तो निघून गेला. त्याने दिलेल्या मेल आयडीवर आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे संजय शिनगारे यांनी पाठवून दिली. दिनांक 3 जुलै 2023 रोजी रोशन सालदाना याने संजय शिनगारे यांना फोन करून तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे प्रोसेसिंग फी म्हणून एक टक्का पाठवा तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा करतो असे सांगून त्याने त्याच्या बँकेच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी कॅन्सल केलेले चेकही पाठवले .त्यानंतर संजय शिनगारे यांनी कंपनीच्या भागीदारांसोबत चर्चा करून दिनांक 4 मे 2023 ,दिनांक पाच जुलै 2023, दिनांक 6 जुलै 2023, दिनांक सात जुलै 2023 ,अशा पाच वेळा प्रत्येकी 50 लाख रुपये असे एकूण अडीच कोटी रुपये प्रोसेसिंग फी म्हणून रोशन सालदाना याला अदा केली. तत्पूर्वी रोशन सालदाना ज्यावेळेस जालन्याला आला होता त्यावेळी पाच कोरे धनादेशही श्री. साई कन्सल्टंट चित्रदुर्ग कर्नाटक कंपनीला दिले होते. हा सर्व प्रकार झाल्यानंतर आठ दिवसात कर्ज रक्कम तुमच्या खात्यावर होईल असा विश्वास रोशन सालदाना यांनी दिला मात्र तसे झाले नाही. त्यानंतर पुन्हा पंधरा ते वीस दिवस रक्कम जमा होण्याची वाट संजय शिंगार यांनी पाहिली परंतु तरीही ती जागा झाली नाही. त्यानंतर पुन्हा फोन लावल्यानंतर रोशन सालदाना याने घरातील नातेवाईकाचे निधन झाले आहे पंधरा दिवसांनी फोन लावा असा बहाना केला. पंधरा दिवसांनी परत फोन लावल्यानंतर ईडीची रेड पडली आहे असे सांगून त्याने फोन बंद केला. त्याच वेळी संजय शिंगारे यांना आपली फसवणूक झाल्याची शंका आली म्हणून सिंगारे हे स्वतः चित्रदुर्ग येथे जाऊन रोशन याला भेटले त्यावेळी देखील त्याने आश्वासन देऊन परत पाठवले. त्यानंतर दिनांक सात मे 2024 ते 11 मे 2024 दरम्यान श्री. साई कन्सल्टंट चित्रदुर्ग येथे संजय शिनगारे हे भेट देत होते परंतु कार्यालय बंदच दिसत होते .तेव्हा त्यांनी आजूबाजूला माहिती घेतली असता या कंपनीने डोंबिवली येथील बिल्डर कडून अशाच प्रकारे खोटे आश्वासन देऊन 80 लाख रुपये प्रोसेसिंग फी च्या बदल्यात घेतले आहेत परंतु कर्ज दिलेले नाही. अशी माहिती मिळाली. तसेच त्याचे इतर साथीदार देखील बनावट असल्याचे सांगण्यात आले. यावेळी संजय शिनगारे यांची आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली जालन्यात परतल्यानंतर चंदंनझीरा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 3 जुलै 2023 ते 11 मे 2024 दरम्यान अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली .या तक्रारीच्या अनुषंगाने चंदंनझीरा पोलिसांनी रोशन सालदाना याच्यासह श्री साई कन्सल्टंस चित्रदुर्ग कर्नाटक कंपनीचे एमडी ,वकील आणि इतरांवर भादवि कलम 420 चा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे उपअधीक्षक रमेश जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे हे करीत आहेत. प्रदीप एकशिंगे यांच्या पथकाने काल दिनांक पाच रोजी कर्नाटक येथून रोशन याला ताब्यात घेऊन जालन्यात आणल्यानंतर आज प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती पी .व्ही .शिंदे यांच्यासमोर उभे केले असता न्यायालयाने 13 जून पर्यंत रोशन सालदाना याला पोलीस कोठडी सुनावली आहे. हा तपास करण्यासाठी समाधान तेलंग्रे, रवी गायकवाड गोकुळसिंग कायटे गजू भोसले निमा घनघाव या आर्थिक गुणाशाखेच्या कर्मचाऱ्यांनी काम केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172