पोलीस तपासणीची बतावणी करून लुटणारी परळीची इराणी गॅंग पोलिसांच्या ताब्यात
जालना- वरकड हॉस्पिटल ते नवीन मोंढा जाणाऱ्या रोडवर पोलीस असल्याची बतावणी करून दिलीप दत्तू क्षीरसागर राहणार कडवंची यांच्या गळ्यातील सोन्याची चैन वजन 16 ग्रॅम किंमत 72 हजार रुपये व दोन सोन्याच्या अंगठ्या वजन 20 ग्रॅम किंमत 90 हजार रुपये असा एकूण एक लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी समोर पोलीस चेकिंग चालू असून गळ्यातील चैन व अंगठ्या काढून ठेवा असे म्हणून लबाडीने दि.6 जून रोजी घेऊन गेले होते.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुना शाखेचे पोलीस करीत असताना 1) तनवीर उर्फ छोटू आजीज आली राहणार बिदर ,हल्ली मुक्काम परळी वैजनाथ
2) जाफर हबीब बेग, राहणार शिवाजीनगर परळी वैजनाथ यांना नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.त्यांच्या ताब्यातून सोन्याची साखळी दोन सोन्याच्या अंगठ्या असा 100% टक्के मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.सदर गॅंग इराणी गॅंग नावाने प्रसिद्ध असून त्यांच्या ताब्यात एक चोरीची मोटरसायकल पण मिळाली आहे.इतर ठिकाणी बरेच गुन्हे नोंद आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172