जालनेकारांनो सावध व्हा! डोक्यावर वाजतेय धोक्याची घंटा; वरिष्ठ भू -वैज्ञानिकाने दिला “हा” इशारा!
जालना- सेवानिवृत्त वरिष्ठ भू वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांना जालनेकरांची काळजी आहे म्हणूनच कदाचित त्यांनी यापूर्वी देखील जालना येथील घाणेवाडी जलाशयाला वारंवार भेट देऊन पाहणी केली होती.
वरिष्ठ भू वैज्ञानिक सुरेश खानापूरकर, सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी श्री. कल्याणकर यांच्यासारख्या तज्ञ माणसांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत, स्थानिक सामाजिक संस्था या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांनी किती वेळा आणि किती वर्षापासून जिल्हा प्रशासनाला घाणेवाडी जलाशयाच्या दुरावस्थेबद्दल अवगत केलं आहे याचे तर गणितच नाही. प्रशासनाला आवश्यक्य सूचनाही दिल्या होत्या परंतु याचा काहीच परिणाम झाला नाही. म्हणून शेवटी हतबल झालेल्या सेवानिवृत्त वरिष्ठ भू -वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना खडेबोल असलेले पत्र लिहिले आहे. खरंतर श्री .खानापूरकर यांना जालन्याशी काहीच देणे घेणे नाही . जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिकेच्या आयुक्त हे देखील तीन वर्षासाठीच असतात. अधिकारी येतात आणि जातात परंतु त्यांनी केलेल्या कामाची चांगली वाईट फळं ही स्थानिक नागरिकांना मिळत असतात. तशातलाच हा घाणेवाडी जलाशयाचा एक प्रश्न आहे. या दोघांनी जर संयुक्त काम केलं तर पुढील अनेक पिढ्या या जलाशयातील पाणी जालनेकर पिऊ शकतील आणि कर्तव्यदक्ष या अधिकाऱ्यांचे नावंओठावर येतील, दुर्लक्ष केले तर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता सुरेश खानापूरकर यांनी व्यक्त केले आहे .त्यासोबत लघु पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता कल्याणकर यांनीही व्यक्त केली आहे आणि त्यांनी दिलेल्या या सूचनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि दुर्घटना घडली तर पुढील अनेक पिढ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना …. त्यासाठीच प्रशासनाला या कामाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी उद्या दिनांक दहा रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान समस्त महाजन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई या मामा चौकामध्ये लाक्षणिक उपोषण म्हणजेच जन आंदोलन करणार आहेत. जिल्हा प्रशासच लक्ष वेधणार आहेत. सेवानिवृत्त वरिष्ठ भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र आणि त्याचं गांभीर्य या दोन्ही गोष्टी आपण वरील व्हिडिओमध्ये पाहू शकता.हेच ते पत्र
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172