“ज्ञानराधा”चा 25 कोटी 32लाख रुपयांचा ग्राहकांना गंडा ; पैठण पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल
पैठण- गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या पैठण येथील शाखेच्या 35 ग्राहकांना तीन कोटी 80 लाख रुपयांना चुना लावला आहे .याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे करीत आहेत. दरम्यान आत्तापर्यंत ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर माजलगाव, बीड येथेही गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता पैठणमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये 118 अर्जदारांनी दिलेल्या तक्रारीवरून 20 कोटी 19 लाख रुपये, तसेच न्यायालयाच्या आदेशान्वये बीड येथील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये 67 लाख 67 हजार रुपये, माजलगाव येथे 17 खातेदारांनी दिलेले तक्रारीवरून 74 लक्ष 24 हजार रुपये आणि त्या पाठोपाठ आता पैठण येथे 36 खातेदारांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संचालक मंडळ आणि इतर अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल झाले आहेत या बँकेच्या संचालकांमध्ये 13 जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 25 कोटी 31 लाख 60 हजार 752 रुपयांची फसवणूक केल्याची गुन्हे विविध ठाक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील पैठण येथील तक्रारदार मुकेश श्रीचंद पंजवानी , वय 38 वर्ष, राहणार माधव नगर पैठण, यांनी त्यांच्या परिवारातील विविध सदस्यांच्या नावावर 15 नोव्हेंबर 2015 पासून वेगवेगळ्या तारखेनुसार 42 लाख 87 हजार 285 रुपये हे ठेवी म्हणून ठेवले होते. तसेच काही मुदत ठेवी देखील होत्या .त्यांची ही रक्कम आणि 31 इतर खातेदारांची रक्कम अशी सर्व मिळून तीन कोटी 69 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपींमध्ये शाखा व्यवस्थापक पवळ, या बँकेचे अध्यक्ष सुरेश कुटे,, अर्चना कुटे, विभाग प्रमुख लाखे, शाखा व्यवस्थापक वैजनाथ डाके, व इतर संचालकांचा समावेश आहे. अद्याप पर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172