घाणेवाडी वाचवा! जिल्हा प्रशासनाला सात दिवसांची मुदत
जालना -जालना शहराला पाणीपुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय म्हणजेच घाणेवाडी येथील तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे . पुढील सात दिवसांमध्ये ही दुरुस्ती करावी अन्यथा अवरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे .
या तलावाचा सांडवा पूर्णपणे वाहून गेलेला आहे. या तलावात पाणी साठा वाढवा म्हणून विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत लाखो ट्रक गाळ काढला आहे. त्यामुळे यावर्षी पाणी क्षमता वाढणार आहे .परंतु सांडव्याची दुरावस्था झाल्यामुळे हा सांडवा कधीही फुटू शकतो, अशी भीती भूवैज्ञानिक आणि पाटबंधारे विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. तो दुरुस्त करावा म्हणून सामाजिक संस्था, घाणेवाडी जल संरक्षण मंच, आणि एकंदरीतच जालनेकारांनी, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या सर्व बाबींचा निषेध म्हणून समस्त महाजन ट्रस्टच्या माध्यमातून सुरू झालेल्या कामाचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रभारी नूतन देसाई यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक 10 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये एक दिवसाचे सद्भावना उपोषण करण्यात आले. या उपोषणाला व्यापारी, उद्योजक ,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि एकंदरीत सामान्य नागरिकांपासून जालनेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना नूतन देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे . आठ दिवसात जर हे काम सुरू झाले नाही तर आमरण उपोषण सुरू होईल असेही त्या म्हणाल्या. या उपोषणासाठी उद्योजक सुनील रायठा,कैलास लोया, उमेश बजाज, रमेश देहेडकर, सौ.रसना देहेडकर, इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय चौधरी, ओमप्रकाश चितळकर, सुरेश केसापूरकर ,प्राध्यापक रावसाहेब ढवळे, अक्षय शिंदे ,आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172