Jalna Districtजालना जिल्हा

जिल्ह्याचा गाडा चालवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी चालवले टोकन यंत्र; कृषी सेवा केंद्राचीही केली पाहणी

जालना – जिल्हाचा गाडा चालवणारे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी रामनगर सिंधी काळेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पेरणी विषयक माहिती घेतली तसेच या परिसरातील कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन खतेबियाण्याची परिस्थिती ही जाणून घेतली. खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पिक लागवडीची पाहणी केली. तसेच बियाणे, खते, औषधी विक्रेत्यांच्या दुकानाना भेट देऊन तपासणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली. यावेळी उपस्थित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी पाऊस व पिक लागवडीची माहिती दिली.

जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे सरासरी लागवड क्षेत्र ६,१९,६९६.४६ हेक्टर असून आज अखेर ११९ मिमी पाऊस झाल्यामुळे आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यामध्ये एकूण ७०,०९९ हेक्‍टर इतक्या क्षेत्रावर ( ११.३१ %) टक्के पेरणी झालेली आहे. सद्यस्थितीमध्ये पाऊस चांगला पडत असल्यामुळे लागवडीचे प्रमाण वाढत आहे. सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सिंधी काळेगाव, ता. जालना येथील शेतकरी विष्णुपंत गिराप यांच्या शेतात भेट देऊन सोयाबीन टोकन पद्धतीने लागवडीबाबत पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वतः बियाणे लागवड केली.

यानंतर परिसरातील कृषी सेवा केंद्रांना भेट देवून बियाणे, रासायनिक खते यांच्या उपलब्धतेबाबत तपासणी करुन खातरजमा केली. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही यांची कृषी सेवा केंद्रांनी तसेच खरीप हंगामाची पेरणी पूर्ण होईपर्यंत कृषी विभागाने याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी तहसिलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी हे देखील उपस्थित होते.

टोकन यंत्राचे काम या टोकन यंत्रामुळे योग्य खोलीवर बियाणे पेरणी करता येते. 25 ते 30 टक्के वेळेची बचत होते. पेरणीच्या खर्चात बचत करून मजुरांची ही बचत होते. तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्चही नगण्य आहे.

कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर कृषी निविष्ठांचे अचूक नियोजन केल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा जसे की बी बियाणे खते हे वेळीच उपलब्ध होत आहे. या वर्षी लवकर झालेल्या मान्सूनच्या सक्रीयतेमुळे खरिपाच्या पीक पेरणीला व लागवडीला वेग आला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button