GDC COIN भाग 2; कोणत्या आरोपींचे बँकेत किती खाते? किती रक्कम? कोणाच्या नावावर ?सविस्तर वाचा

जालना- जीडीसी(GDC COIN) क्रिप्टो करेन्सी, आभासी चलन या माध्यमातून 203 जणांची फसवणूक करण्यात आली होती. यासंदर्भात जालना येथे आर्थिक गुन्हा शाखेकडे 203 गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्यानंतर हा तपास पूर्ण झाला आहे .आरोपींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत आणि त्यामधून गुंतवणूकदारांची रक्कम परत केला जाणार आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दि.15 रोजी पहिल्या भागामध्ये कोणत्या आरोपींची कोणती वाहने होती, आणि ती किती रुपयांची होती हे आपण पाहिलं.आता दुसऱ्या भागामध्ये नऊ पैकी आठ आरोपींच्या खात्यावर किती रक्कम होती आणि कोणाच्या नावावर होती ते पाहणार आहोत.
अमोद वसंतराव मेहतर याने स्वतःच्या आणि त्याच्या मुलगा आदित्य अमोद या दोघांच्या नावावर आठ बँक खाते उघडून एकूण 37 लक्ष 59 हजार रुपये रक्कम ठेवली होती. याच प्रकरणातील दुसऱ्या आरोपी श्रीमती शर्वरी अमोद मेहतर यांनी तीन खाते उघडून 83 हजार रुपये रक्कम जमा केली होती. तिसरे आरोपी रमेश बाबुराव उत्तेकर यांनी स्वतः आणि मुलाच्या नावावर चार खाते उघडले होते. मुलगा दिवाण रमेश उत्तेकर आणि स्वतःच्या खात्यावर एकूण एक लाख 48 हजार रुपये रक्कम शिल्लक होती. चौथे आरोपी वेंकटेश दशरथ भोई यांचे स्वतःचे खाते आणि त्यांचे काका पांडुरंग विनायक भोई यांचे खाते अशा एकूण दोन खात्यांवर तीन लाख 43 हजार रुपये रक्कम शिल्लक होती. इरफान मोईद्दीन सय्यद याने स्वतःसह मुलीचे एक खाते उघडले होते एकूण पाच खात्यांवर 17 लाख रुपयांची रक्कम शिल्लक होती. किरण भरतराव खरात यांनी त्यांच्या आईसह स्वतःचे मिळून एकूण 14 खाते उघडले होते. त्यामध्ये आठ लाख रुपये शिल्लक होते. श्रीमती दीप्ती किरण खरात यांच्या चार खात्यांवर एक लाख 16 हजारांची रक्कम शिल्लक आहे .मोहम्मद साबेर याकूब घोची यांनी मुलाच्या नावावर एक खाते आणि स्वतःचे एक खाते अशा एकूण दोन खात्यांमध्ये चार लाख 38 हजार रुपयांची रक्कम शिल्लक ठेवली होती.
दरम्यान आरोपी त्यांनी स्वतःचे जवळचे नातेवाईक व्यावसायिक बँक खाते अशा वेगवेगळ्या ठिकाणी बारा खाती उघडली होती त्यामध्ये दशरथ भोई चा भाऊ भरत भोई, राजकोट येथील मुकेश धीरजलाल जगानी, इचलकरंजी येथील प्रदीप महादेव डाके, केमो इन्फोटेक, एस एस इ इन्फोटेक ग्लोबल कन्सल्टिंग अमीतो इंटरप्राईजेस ब्राईट कन्सल्टन्सी( ही इरफान सय्यद ची कंपनी आहे) मनीषा प्रमोद पवार एव्ही इंटरप्राईजेस रिचा बाबुराव गुप्ता अशा एकूण 12 जणांच्या खात्यावर 14 लाख 41 हजार रुपयांची रक्कम होती एकूण आठ आरोपी आणि सामायिक काही खाते अशी सर्व मिळून 96 लाख 34 हजार रुपयांची बँकेत असलेली रक्कम आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गोठवलेली आहे. ही रक्कम काढून घेऊन गुंतवणूकदारांना परत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे कोणत्या आरोपींची कुठे आहे स्थावर, जंगम मालमत्ता मालमत्ता आणि किती रुपयांची आहे ते पुढील भागात पाहूया.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172