Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

कृषी सेवा केंद्र; दोन कायमस्वरूपी रद्द; नऊ निलंबित तर दोघांवर फौजदारी गुन्हे

जालना- पेरण्यांचे दिवस सुरू होताच गोंधळ सुरू होतो तो कृषी सेवा केंद्रांचा. खतांची चढ्या दराने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, मुदत बाह्य बियाण्यांची विक्री आणि यामधून  शेतकऱ्यांची फसवणूक. फसवणूक झाल्यानंतर मनस्तापासोबत शेतकरी कधी- कधी मरणही जवळ करतो. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कृषी केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.  यामध्ये दोषी आढळलेल्या कृषी केंद्रांवर कारवाई केले जात आहे .अनावधानाने झालेल्या चुकांमुळे दुकानांचे परवाने निलंबित केले जात आहेत तर जाणून-बुजून केलेल्या चुकांमुळे काही दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. आणि ज्या प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करता येऊ शकतील असे गुन्हेही दाखल केले आहेत .यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाचे प्रमुख श्री काटे यांनी ज्या कारवाया केल्या त्या पुढील प्रमाणे

कायमस्वरूपी परवाना रद्द
1. डोमेश्वर कृषी सेवा केंद्र ,अंबड.2. भक्ती कृषी सेवा केंद्र बदनापूर.कांही कालावधीसाठी परवाना निलंबन
1. गणराज ऍग्रो ट्रेडर्स अंबड,2. सालासर ऍग्रो एजन्सी राजुर गणपती ,3. गणेशकृपा कृषी सेवा केंद्र राजुर गणपती ,4. श्रीराम कृषी सेवा केंद्र घनसावंगी.
5. खेत्रे कृषी सेवा केंद्र तीर्थपुरी 6. साई ऍग्रो ट्रेडर्स अंबड.7. आटोळे ऍग्रो मार्ट् हिसवन तालुका जालना.
8. कृषिरत्न ऍग्रो एजन्सी परतुर9. भारत अग्रो एजन्सी परतुर.

पोलिसात गुन्हे दाखल
1. डोमेश्वर कृषी सेवा केंद्र अंबड. (कपाशी बियाणे जादा दराने विक्री करताना कृषी विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे)
2. Green fertilizer OPC Pvt Ltd company. (सदर खत कंपनीचा उत्पादन व विक्रीचा राज्यात परवाना नसताना विक्री केल्याचे आढळून आले सदर कंपनीवर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे)

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button