19 ता. पोलीस भरती; 125 पदांसाठी 6,978 अर्ज; एकाच वेळी अनेक ठिकाणी परीक्षा असेल तर काय करावे?

जालना -जालना पोलीस कवायात मैदानावर दिनांक 19 ला पहाटे साडेचार वाजल्यापासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. जालना पोलीस अधीक्षकांच्या आस्थापनेवरील 102 पोलीस शिपाई तर 23 पोलीस शिपाई चालक असे एकूण 125 पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 471 तर पोलीस शिपाई चालक पदासाठी 2907 असे एकूण सहा हजार 978 अर्ज आले होते. त्या अनुषंगाने हे उमेदवार परीक्षा देणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान एक उमेदवार पाच ठिकाणी अर्ज करू शकतो परंतु एकाच दिवशी जर अनेक ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू असेल तर त्यासाठी काय करावे? याविषयी सविस्तर माहिती दिली आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी .त्यांच्यासोबतच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी हे देखील उपस्थित होते. एकूणच भरती प्रक्रियेविषयी शंका आणि त्याचे समाधान याविषयी पोलीस अधीक्षकांनी आज पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांचीही उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172