कुणाचेही नाव न घेता मंत्री भुजबळांनी काढली औकात! ओबीसी समाजाचे आंदोलन तूर्त स्थगित
जालना- गेल्या अनेक दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे “आरक्षण बचाव आंदोलन” सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील प्रा. लक्ष्मण हाके आणि घनसांवगी तालुक्यातील लक्ष्मण वाघमारे या दोघांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आज राज्य शासनाच्या अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शासनाच्या वतीने आश्वासन मिळाल्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमित भांडे यांनी एका पत्राद्वारे हे आश्वासन दिले आहे आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही तसेच आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची खात्री दिली आहे सदरील पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने मंत्री महोदयांच्या माध्यमातून उपोषण कर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान यावेळी बोलताना ओबीसी नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोणाचे नाव न घेता चांगलेच घणाघात केले “औकती मधे रहा बेट्यांनो” अशी टीका करत असतानाच एकदा जात निहाय जनगणना होऊनच जाऊ द्या अशी मागणी ही त्यांनी केली.
उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आज ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन उद्योग मंत्री उदय सामंत कृषिमंत्री धनंजय मुंडे जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, गोपीचंद पडळकर गुलाबराव पाटील प्रकाश शेंडगे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह जालना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी जालन्याचे खासदार कल्याण काळे ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर जालन्याचे ओबीसी नेते तथा भाजपचे पदाधिकारी अशोक अण्णा पांगारकर माजी आमदार शिवाजी चौथे यांनीही भेट दिली.
पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी इतर राजकारणी आणि कुठल्याही समाजाचे नाव न घेता कडक शब्दात आणि मिमिक्री करून टीका केली. सगे- सोयरे हा शब्द ना घटनेमध्ये आहे ना हिंदूंच्या कायद्यामध्ये आहे. त्याची व्याख्या काय आहे हेच कळत नाही हे शेपूट लांबतच जात आहे. त्यामुळे यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही आणि ते कोर्टात टिकणार देखील नाही. असे एका मंत्र्याने सांगितले आहे असे भुजबळ म्हणाले. त्यातच काही राजकारणी हे इकडे एक बोलतील आणि तिकडे एक बोलतील अशा दोन्ही बाजूने डमरू वाजवणाऱ्याचे काम करत असल्याचेही ते म्हणाले. आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही तर जे रंजले गांजले आहेत गरिबीत पिंजले आहेत त्या सर्वांना बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून आरक्षण ठेवण्यात आलेले आहे .आपल्या भाषणामध्ये मंत्र भुजबळ आणि तीन वेळा उर्दूतील शेर शायरी चा उपयोग केला त्यामध्ये ते म्हणाले “शरीफ है हम किसी से लढते, नही जानता है हम किसी के बाप से डरते नही”.” जोर जुल्म से तय नही होते सियासत के फैसले, ये तो उडान तय करेगी की आसमान किसका है!. आपल्याला लढायचं आहे ,आपल्याला धमक्या देता येत नाहीत आणि दादागिरीही करता येत नाही. असे भुजबळ म्हणाले. दरम्यान पंकजा मुंडेंना जाणून बुजून ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्या होत्या म्हणून पाडण्यात आल्याचा आरोपही मंत्री छगन भुजबळ यांनी केला. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि नेते गोपीचंद पडळकर यांचेही समायोजित भाषण झाले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172