Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

श्री म.स्था जैन शाळेच्या शिक्षकाचा तिढा सुटेना

जालना -शहरातील प्रतिष्ठित वर्गाकडून आणि सेवार्थ भाव म्हणून चालवली जाणारी शैक्षणिक संस्था म्हणून श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघाच्या शिक्षण संस्थांकडे पाहिले जाते .मग त्यामध्ये श्री म.स्था. जैन इंग्रजी माध्यम ची शाळा, अंध विद्यालय, प्राथमिक विद्यालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अशा, एवढेच नव्हे तर एक गोशाळा देखील सक्षमपणे चालवले जाते. वेगवेगळ्या विभागात या संस्था चालवल्या जातात आणि या संस्थांचे नियंत्रण देखील वेगवेगळी समिती करते .असे सर्व असताना शैक्षणिक संस्था मात्र नेहमीच काही ना काही तरी कारणामुळे चर्चेत असतात. आता सध्या चर्चेत आहे ती या संस्थेची श्री महावीर स्थानकवाशी जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक ची अल्पसंख्यांक शाळा.

संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे सर्वजण त्रस्त आहेत, गोंधळून गेलेल्या संचालक मंडळामुळे शिक्षण विभाग देखील त्रस्त झालेला आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम शिक्षकांवर, त्यांच्या शिकवण्यावर आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांवर होत आहे. शिक्षक देखील शिकवण्याची कामं सोडून उपोषणे, आंदोलने, अर्ज फाटे, तक्रारी यामध्येच जास्त वेळ घालवत आहेत.

असेच एक प्रकरण सध्या चालू आहे ते म्हणजे सहशिक्षक प्रदीप विश्वनाथ राठोड यांच्या संदर्भात. संस्थेचे मुख्याध्यापक शांतीलाल वानगोता यांनी प्रदीप विश्वनाथ राठोड यांना दिनांक 2 सप्टेंबर 2015 रोजी शाळेच्या विनाअनुदानित पदावर सहशिक्षक म्हणून नियुक्ती दिली. त्यानंतर 12 जून 2017 ला या विनाअनुदानित तुकड्या बंद केल्या आणि तसेच शासनाला देखील कळवले. एक वर्ष बंद ठेवलेल्या तुकड्या 17 जानेवारी 2019 घेतलेल्या ठरावानुसार ला पुन्हा सुरू केल्या. दरम्यानच्या काळात सहशिक्षक श्री राठोड यांना मुख्याध्यापकांनी पत्र क्रमांक 15, 2017- 18 नुसार सेवामुक्त केले होते .ही सेवा मुक्ती रद्द करून पुन्हा दिनांक 12 जून 2017 पासून प्रदीप राठोड यांना सहशिक्षक पदावर रुजू करून घेतले. आणि दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पासून आठ हजार रुपये मानधन ठरले. आता पहा तुकड्या बंद केल्या 2017 ला.  प्रदीप राठोड यांना सेवा मुक्त केले 2018 ला तुकड्या पुन्हा सुरू झाल्या 2019 ला मुख्याध्यापक शांतीलाल वानगोता यांनी प्रदीप राठोड यांना रुजू होण्याचे पत्र दिले 31 जानेवारी 2019 ला म्हणजेच संस्थेने तब्बल 18 महिन्यांपूर्वी ज्या शिक्षकाला सेवामुक्त केले त्याच शिक्षकाला रुजू करून घेतले आहे आणि तसा आदेशही काढला आहे. दरम्यान 2015 मध्ये बीएससी या गुणवत्तेवर लागलेल्या या शिक्षकाने बदनापूर येथे 2017 मध्ये एमएस सी च्या अंतिम वर्षाचा नियमित विद्यार्थी म्हणून अभ्यासक्रमाही पूर्ण केला आहे .त्या संदर्भात निर्मल क्रीडा आणि समाज प्रबोधन च्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बदनापूरणे दिनांक 7 जानेवारी 2021 ला शाळेच्या मुख्याध्यापकांना अधिकृत पत्र देऊन कळवले ही आहे . या शिक्षकाची शाळेतीलच इतर शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने ,एकाच वेळी शिक्षण आणि नोकरी करणे ही शासनाची दिशाभूल ठरते त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने संस्थेला पत्र देऊन शिक्षक प्रदीप राठोड यांनी शासनाची फसवणूक केली असल्याचेही म्हटले होते, परंतु संस्थेने मन मोठे करून शिक्षकाची ही फसवणूक देखील क्षमापित केली आणि या शिक्षकाला वैयक्तिक मान्यता देण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली. संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांना दिलेले पत्र आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला केलेली विनंती हा सर्व गोंधळ पुढे वाढतच गेला . त्याचाच परिपाक म्हणजे पुढे न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावले गेले ते देखील कमी पडले म्हणून मागील आठवड्यामध्ये शिक्षक प्रदीप राठोड यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणही केले.आज त्याची काय परिस्थिती आहे  मुख्याध्यापक  शांतीलाल वानगोता काय म्हणाले शिक्षण विभागाचे काय म्हणणे आहे ते पाहूयात  पुढच्या भागात.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button