अकरा दरोडेखोरांनी टाकला “तो” दरोडा
नांदेड- कंधार तालुक्यातील कवठा येथे शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. 11 आरोपींपैकी सहा आरोपी हे सध्या अटक आहेत, उर्वरित पाच आरोपींपैकी एक आरोपी हा जालना जिल्ह्यातील परतुर येथील आहे. यामध्ये सहा आरोपी हे पर राज्यातील आहेत.
कंधार तालुक्यातील कवठा येथे राहणारे सोन्या-चांदीचे व्यापारी गजानन श्रीहरी येरावार यांच्या घरी दिनांक 15 जून रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला .या दरोड्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने ,रोख रक्कम असा एकूण 41 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. या संदर्भात कंधार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात दरोडा पडल्यामुळे पोलिसांची तपास यंत्रणा गतिमान झाली आणि या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांकडे आला. पोलिसांनी टाकलेल्या जाळ्यानुसार त्यांना हा दरोडा परभणी आणि नांदेड येथे राहणाऱ्या आरोपींनी टाकला असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पोलिसांची विविध पथके या आरोपींच्या शोधात रवाना झाली . पोलिसांनी परभणी आणि नांदेड येथून कांहीआरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये सोनू सिंग बालवीर सिंग भोंड वय 22 वर्षे राहणार उदना नगर सुरत गुजरात, जयसिंग शेरासिंग बावरी वय 20 वर्ष राहणार दंतेश्वर संतोषवाडी बडोदा गुजरात, अरुण नागोराव गोरे वय 45 वर्षे राहणार उस्माननगर तालुका कंधार, शेख खदीर शेख मगदूम साब व 50 वर्ष राहणार इकबाल नगर धनेगाव जिल्हा नांदेड ,राजासिंग हिरासिंग टाक वय 22 वर्षे राहणार अण्णाभाऊ साठे नगर जिंतूर रोड परभणी, गुरुमुखसिंग हिरासिंग टाक वय 25 वर्ष राहणार नवा मोंढा जिंतूर रोड परभणी, यांना ताब्यात घेऊन कवठा येथे टाकलेल्या दरोडा बाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर सहकारी सतबिरसिंग बलवंतसिंग टाक राहणार अकोला, जसपालसिंग हरीसिंग जुनी राहणार परतुर जिल्हा जालना ,राजपाल सिंग दुधानी राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा, सरदारखान आमिर खान राहणार पुसद जिल्हा यवतमाळ, मंटासिंग राहणार धुळे, अशा अकरा जणांनी मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिली. दरम्यान या प्रकरणात दरोडेखोरांनी लुटून नेलेल्या ऐवजा पैकी 405 ग्रॅम सोन्याचे दागिने, 55 ग्राम चांदीचे दागिने व नगदी आठ लाख 50 हजार रुपये असा एकूण 29 लाख 43 हजार 461 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेले मोबाईल आणि वाहन असा एकूण पाच लाख 45 हजार रुपये आणि पळून नेलेला ऐवज, दोन्ही मिळून 34 लाख 88 हजार 461 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे ,रविकुमार वावळे ,पोलीस उपनिरीक्षक आनंद बिछवार , मिलिंद सोनकांबळे यांचा समावेश होता
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172