Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

क्षमतेपेक्षा जास्त खंडणी मागितल्याने फुटले बिंग, शेजार्‍यानेच शेजाऱ्याच्या मुलाचे केले होते अपहरण

जालना -शेजाऱ्यानेच शेजाऱ्याच्या तेरा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागितली ,ही खंडणी मागत असताना अपहरणकर्त्या मुलाच्या वडिलांची क्षमता लक्षात न घेतल्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि खंडणी तर सोडाच परंतु पोलिसांनी या खंडणीबहाद्दरासह अन्य दोघांना पकडले आहे आणि या बालकाची ही सुखरूप सुटका केली आहे.

शहरातील अमर छाया टॉकीज जवळील पुष्कर हॉस्पिटल समोर कृष्णा गोपीनाथराव मुजमुले वय, 38 वर्ष हे एक छोटे व्यापारी राहतात .त्यांचा  13 वर्षे  वयाचा मुलगा दि. 25 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला. त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास या प्रकरणातील आरोपीने कृष्णा मुजमुले यांना फोन करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली आणि सहा वाजेच्या सुमारास देवमूर्ती येथे ती आणून देण्यास सांगितले. त्यासोबत काही हालचाल केल्यास मुलाला एड्स स्टेराइडचे इंजेक्शन देण्याची ही धमकी दिली. या धमकी नंतर मुजमुले यांची खंडणी देण्याची क्षमता नसल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला.  पोलिसांची तपासचक्र सुरू झाली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाळे टाकले. दरम्यान खंडणी बहाद्दराची पाच कोटी वरून तीन कोटी, तीन कोटी वरून वीस लाखापर्यंत मागणी येऊन ठेपली आणि पोलिसांच्या हे लक्षात आले की हे सराईत खंडणी बहाद्दर नाहीत तर नवखे आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला आणि आरोपींनी मागितलेल्या पैशानुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास कन्हैया नगर जवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे सापळा रचून या आरोपींना पकडले आहे. कृष्णा गोपीनाथ मुजमुले यांच्या शेजारीच राहणारा आरोपी रोहित राजा भुरेवाल, राहणार पुष्कर हॉस्पिटल समोर जालना .याने त्याचे इतर दोन साथीदार अरबाज अबकर शेख राहणार उडपी हॉटेल जवळ टांगा स्टॅन्ड जालना व वरून नितीन शर्मा राहणार गायत्री नगर नवीन जालना यांच्या मदतीने हा प्रकार घडवून आणला होता. यासंदर्भात पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही सविस्तर माहिती दिली आहे.

 

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button