आपल्या पाल्याला खेळाडू बनवायचे असेल तर इथे घ्या प्रवेश
जालना- महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा क्रीडा प्रबोधीनी कार्यरत आहेत. क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विभागस्तर चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे. सदर विभागस्तर चाचणीमध्ये सहभागी होणेसाठी खेळाडूंनी आपले नाव, खेळप्रकार, जन्म दिनांक व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र इत्यादी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे दि. 5 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी कळविले आहे.
सन 2024-25 साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर 9 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (50 टक्के) व कौशल्य चाचणी (50 टक्के) प्रक्रियेअंतर्गत पुढीलप्रमाणे ज्युडो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटीक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा 17 क्रीडा प्रकारात प्रवेश दिले जाणार आहेत. सरळ प्रवेश प्रक्रियेत संबंधीत खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्याचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्य चाचणी संबधीत खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे अशा खेळाडूंना संबंधीत खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो. अधिक माहितीसाठी संतोष वाबळे मो.7588169493, रेखा परदेशी मो.9022951924 यांना संपर्क साधावा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172