ज्ञानराधा मल्टीस्टेट ;सहा तालुक्यात 31 कोटींचा घोटाळा; तक्रारींचा ओघ सुरूच
जालना -ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी , बीड शाखा जालना या सोसायटीच्या जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये 31 कोटींचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे .यासंदर्भात पहिला गुन्हा अंबड येथे दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील गुंतवणूकदारांनी जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आपल्या तक्रारी नोंदविल्या आहेत.
जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आला आहे .तक्रारीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद ,बदनापूर ,मंठा, जालना आणि अंबड अशा सहा तालुक्यामधून या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुमारे 600 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची एकूण गुंतवणूक सुमारे 31 कोटी पर्यंत जात आहे. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस या बँकेचे अध्यक्ष श्री.कुटे यांच्या मार्गावर आहेत. कदाचित कुटे आणि त्यांच्या संचालक मंडळाची मालमत्ता देखील जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही .जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतुर या दोन्ही तालुक्यातून अद्याप पर्यंत फसवणूक झाल्याची एकही तक्रार नाही. दरम्यान क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा सर्व व्यवहार हा थेट दिल्लीवरून पाहिल्या जातो. त्यामुळे आर्थिक पतसंस्थांवर स्थानिक पातळीवर ज्या जिल्हा उपनिबंधकांचे नियंत्रण असते त्या नियंत्रण कक्षेत या को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत मोठा घोटाळा होत नाही तोपर्यंत अशा सोसायट्यांमधील घोटाळे बाहेर येत नाहीत .यापूर्वी पैठण ,माजलगाव ,बीड येथेही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172