Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

थेट वारीमधुन; पंढरीचे भूत मोठे- ह.भ.प. गोदावरीताई मुंढे यांच्या सोबत

जेजुरी- पंढरीचे भूत मोठे| आल्या गेल्या झडपी वाटे

तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतूनी| पंढरीचे भूत मोठे|

आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि सर्वत्र वारी, दिंडी, या भक्तीमय वातावरणाचा सुगंध दरवळत आहे. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यामधून पंढरीच्या दिशेने पावले  पडत आहेत आणि या सर्व वातावरणाला आणखीनच भक्तीमय करून जनतेला सत्संगाच्या प्रवाहात आणण्यासाठी ,चंद्रभागेमध्ये डुबकी मारून जीवन कृतार्थ करण्यासाठी हरि भक्त परायण, वेद शास्त्र संपन्न, कीर्तनकार, प्रवचनकार, संत महंत झटत असतात. त्यातीलच महाराष्ट्रातील गवळण गायिका हरिभक्त परायण गोदावरीताई मुंढे यादेखील गेल्या अनेक वर्षांपासून वारी करतात .मागच्या वर्षी देखील गोदावरीताई मुंढे या ईडीटीव्हीच्या(edtvjalna) प्रतिनिधीला वारीमध्ये भेटल्या होत्या आणि सुंदर गवळण त्यांनी वाचकांसाठी गायली होती. यावेळी देखील त्या जेजुरी ते वाल्हे दरम्यान दिंडीमध्ये चालत असताना पुन्हा भेटल्या आणि संत तुकारामांचा अभंग “पंढरीचे भूत मोठे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतूनी .असे सांगत असतानाच स्वतःसह अनेकांना त्या पंढरीच्या भुताकडे घेऊन जात आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button