Jalna Districtजालना जिल्हा

किया गाडीने स्कुटीला नेले फरपटत; प्रवासी दाम्पत्य ठार

अंबड-  सोलापूर- धुळे महामार्गावर 52वर लेंबेचीवाडी समोर अपघात रविवारी सायंकाळी सहा वाजता सुमारास स्कुटी आणि किया या दोन वाहनांचा अपघात झाला या अपघातामध्ये स्कुटी वरील दांपत्य ठार झाले आहे.

पोलीस उपनिरीक्षक श्री. निकम यांच्या पथकाने अपघात स्थळाची पाहणी केली असता MH-44-S-9560 किया कार ही छ.संभाजी नगर कडून बीड कडे जात असताना सदर कार चालकाचा कार वरील ताबा सुटला आणि कार रस्ता दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेला म्हणजेच पाचोड  ते छ .संभाजीनगर कडे जाणाऱ्या स्कूटी क्रं MH 21 DN 9923 या स्कूटी ला 50ते 60 मीटर पर्यंत फरफटत नेऊन त्यांचे मरणास कारणीभूत झाले. स्कूटी वरील मयत प्रवासी 1)सतीश शाहुजी मगरे वय 32 वर्ष रा. अंकुश नगर सहकारी सा.कारखाना व 2)तेजल सतीश मगरे वय 27 वर्ष रा.अंकुश नगर सहकारी सा.कारखाना .हे दांपत्य ठार झाले आहे.कार चालकाचे नाव कळले नाही तो घटना स्थळावरून फरार आहे. अपघातातील मृतदेह पाचोड शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून अंबड पो. स्टे. चे अंमलदार चव्हाण पंचनामा करीत आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button