Jalna Districtजालना जिल्हाराज्य

सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मिळाले तीन कोटी 65 लाखांचे घबाड

अंबाजोगाई- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे असलेल्या तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे नियमापेक्षा जास्त म्हणजेच तीन कोटी 65 लाख रुपयांचा घबाड उघडकीस आले आहे याप्रकरणी शंकर किसनराव शिंदे पोलीस उप अधीक्षक,नेमणुक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. बीड. यांनी दिलेल्या तक्रारीवरून या कार्यकारी अभियंताच्या पत्नीसह दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे-

संजयकुमार शशिकांत कोकणे.वय 51 वर्ष तत्कालीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई जि. बीड.(वर्ग 1) सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई,(R.D.D.-4 ) रा.पाखल रोड.नाशिक.
2) सौ.ज्योती संजकुमार कोकणे रा.नाशिक
अपसंपदा रक्कम
30264141.08/- रुपये (तीन कोटी दोन लाख 64 हजार एकशे एकेचाळीस पॉईंट झिरो आठ रुपये.) म्हणजेच ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा सुमारे २३८.८४ टक्के जास्त अपसंपदा.
आरोपी लोकसेवक श्री संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई
(वर्ग १ ) रा. पखाल रोड नाशिक यांचे विरुद्ध दिनांक 22/02/2022 रोजी सापळा कारवाई नंतर पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे गु.र.नं.274/2022 अन्वये कलम 7, भ्र.प्र.अधि.1988 अन्वये दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली.लोकसेवक यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे (दि.01/09/2010 ते दि.22/06/2022) चे दरम्यान लोकसेवक श्री. संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई ( वर्ग १) यांनी त्यांचे सेवा कालावधीतील परिक्षण कालावधी दरम्यान सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा रुपये 302 64 141.08 रुपये म्हणजेच(238.84 टक्के) रकमेची अपसंपदा संपादित केली आहे. एकूण अपसंपदे पैकी श्री संजयकुमार शशिकांत कोकणे यांची पत्नी सौ. ज्योती संजय कुमार कोकणे यांनी सुमारे ,1,12,60,000/-( एक कोटी बारा लाख साठ हजार रुपयाची) मालमत्ता स्वतःच्या नावे धारण करून लोकसेवक श्री संजयकुमार कोकणे यांना अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे (प्रोत्साहन दिल्याचे )उघड चौकशीत निष्पन्न झाले म्हणून लोकसेवक श्री संजयकुमार शशिकांत कोकणे तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई जिल्हा बीड,(वर्ग 1) सध्या कार्यकारी अभियंता विकास विभाग क्रमांक चार अंधेरी मुंबई,(R.D.D.-4 )मूळ रा. येवला तालुका येवला जि. नाशिक ह. मु. पखाल रोड वडाळा नाशिक यांचे विरुद्ध कलम 13 (1)(ब) व ,13 (2)भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 व लोकसेवक श्री संजयकुमार कोकणे यांना हेतूपुरस्सर व बेकायदेशीरपणे अपसंपदा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून सौ. ज्योती संजय कुमार कोकणे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 (संशोधन ,2018) चे कलम 12 प्रमाणे. आरोपी लोकसेवक संजय कुमार कोकणे व त्यांची पत्नी सौ ज्योती कोकने यांचे विरुद्ध
पो.स्टे. अंबाजोगाई शहर येथे गु.र.नं.-294 /2024 कलम 13(1)(ब) व 13(2),12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास श्री .युनुस शेख पोलीस निरीक्षक ला. प्र.वी. बीड हे करीत आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button