Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

दिल्या घरी सुखी रहा! मनपा आयुक्तांचा शिक्षकांना कानमंत्र

जालना- शाळा सुरू झाल्या की लगबग सुरू होते ती शिक्षकांच्या बदल्यांची .जालना मनपा देखील त्याला अपवाद नाही. शहराच्या हद्दीमध्ये सर्व शाळा असतानाही आपल्याला घराजवळची शाळा मिळावी या मागणीसाठी सर्व शिक्षकांची धडपड सुरू असते. परंतु या धडपडीला मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी लगाम लावला आहे आणि ज्या ठिकाणी नियुक्ती होईल त्याच ठिकाणी वर्षभर काम करावे लागेल .,असा कानमंत्रही दिला आहे. दरम्यान तूर्तास शिक्षणाधिकारी नाही परंतु ज्यावेळी शिक्षणाधिकारी येईल त्यावेळेस यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल कारण सद्य परिस्थितीमध्ये शिक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळा अधिकारी नियुक्त नाही असेही ते म्हणाले. या समुपदेशनाने झालेल्या बदल्यानुसार ज्या शाळेवर ज्या शिक्षकाची बदली झाली आहे वर्षभर त्या शिक्षकाला तिथेच काम करावे लागणार आहे असेही त्यांनी खडसावले.

जालना मनपा मध्ये झालेल्या शिक्षकांच्या या समुपदेशन बदल्यांसाठी जालना शहर मनपा आयुक्त संतोष खांडेकर उपायुक्त नंदा गायकवाड सह आयुक्त केशव कानपुडे लिपिक महेश मसाले यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

दरम्यान जालना शहरांमध्ये मनपाच्या पहिली ते आठवीपर्यंत 16 शाळा आहेत त्यामध्ये उर्दू माध्यम सहा तर मराठी माध्यमच्या दहा शाळांचा समावेश आहे आजच्या परिस्थितीमध्ये एकूण 16 शाळांमध्ये सुमारे हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे शासनाच्या नियमानुसार वीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा निकष आहे त्यामुळे जालना मनपामध्ये सध्या 65 शिक्षक कार्यरत आहे परंतु विद्यार्थी संख्या लक्षात घेता काही शिक्षक अतिरिक्त होत आहेत कोणत्या कोणत्या प्रवर्गातील शिक्षक अतिरिक्त होत आहेत हेच सध्या कळायला मार्ग नाही कारण 2019 मध्ये बिंदू नामावली तयार केली होती त्यानंतर ही नामावलीच नाही त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचे किती शिक्षक असावेत हे निकष लावता येत नाहीत जालना मनपाला 65 शिक्षकांची मान्यता आहे परंतु तीन शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे सध्या एकूण 65 शिक्षक कार्यरत आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button