Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

535 रिक्त पदांसाठी सोमवारी जालन्यात भरती

जालना – जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI),जालना यांच्या संयुक्त विद्यामाने दि. 15 जुलै, 2024 रोजी आयटीआय जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


या मेळाव्यात दहावी/बारावी/आय.टी.आय./बी.ए./बी.कॉम/बी.एससी./एम.कॉम//डिप्लोमा व बी.ई./डिप्लोमाॲग्री/बी.एससी.ॲग्री/ एम.एस.सी. ॲग्री /एम.बी.ए/एम.बी.ए./एम.एस.डब्ल्यु. इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक महिला उमेदवारासाठी एकूण 535 रिक्त पदेउपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 12 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, कौशल्य विकास प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणा-या शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये मेटारोल ईस्पाट प्रा.लि.एमआयडीसी, जालना यांची 13 पदे ,विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि.,जालना यांची 20 पदे, एन.आर. बी. बियरिंग्ज लिमिटेड एमआयडीसी, जालना यांची 50 पदे. धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लि. MIDC शेंद्रा, छत्रपती संभाजीनगर यांची 150 पदे, टॅलेनसेतु सर्व्हिसेस प्रायव्हेट लि.पुणे यांची 50पदे, एस.आर..जेस्टील प्रा.लि. जालना यांची 10पदे, भाग्यलक्ष्मी रोंलिग मिल प्रा. लि, एमआयडीसी, जालना याची 25 पदे, ॲप्रोक्रॉप इंजिनिअरींग प्रा.लि.एमआयडीसी, जालना यांची 6 पदे, नव-भारत फर्टिलायझर्स लि. छत्रपती संभाजीनगर यांची 13 पदे, ओमसाई मॅनपॉवर प्रा.लि. जालना यांची 40 पदे, कॅनपॅक इंडिया प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर यांची 08 पदे, पिपलट्री व्हेंचुअर प्रा. लि. नागपुर यांची 150 पदे, अशी एकूण 535 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 12 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरतीकरणारआहेत.
या सुवर्णसंधीचा रोजगार इच्छुक जिल्हातील जास्तीतजास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा चाचणी व मुलाखतीसाठी किमान पाच प्रतीत रिझ्युम / बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्ड / सेवा योजन नोंदणी छाया प्रतीसह सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगा रवेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉबफेअर टॅबवर क्लिक करुन जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्यांच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅडप्लायकरावे, यासाठी काही अडचणआल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा, असे आवाहन भुजंग रिठे, सहायकआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button