ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरण; आरोपींना ताब्यात घेण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या त्रुटी; आरोपींना नेऊन सोडा आणि पुन्हा प्रक्रिया करा; रात्री8 वाजता न्यायालयाचे आदेश
जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदकर यांना आज न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते .आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक कार्यालयाच्या वतीने सरकारची बाजू मांडण्यात आली. यावेळी पाचव्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. बी.गोरे यांनी पाच तासांच्या सखोल अभ्यासानंतर, प्राप्त माहितीनुसार दिल्ली आणि बंगाल येथील काही निर्णयांचा आधार घेऊन त्यांनी आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की, आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करा आणि या प्रकरणातील आरोपी सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदकर यांना ज्या कारागृहातून आणले त्या कारागृहात नेऊन सोडा आणि पुन्हा पहिल्यापासून प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश आज रात्री आठ वाजेच्या सुमारास दिले.
आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर न्यायालयामध्ये सुमारे दोन्ही वकिलांचा एक तास युक्तिवाद चालला. युक्तिवाद झाल्यानंतर आरोपींना परत घेऊन जात असताना गुंतवणूकदारांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक रमेश जायभाये आणि या प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी गुंतवणूकदारांची समजूत काढून रवाना केले. त्यानंतरही या गुंतवणूकदारांचे समाधान न झाल्याने आरोपींच्या गाडीचा पाठलाग करत हे गुंतवणूकदार आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयापर्यंत पोहोचले.
याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील विधींना अशोक मते यांनी काम पाहिले तर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सौ. मोरे यांच्या वतीने विधीज्ञ रोहित बनवासकर यांनी काम पाहिले.
सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये सौ. स्मिता मोरे वय 41 वर्ष राहणार एस. आर. पी .एफ जालना यांनी दिनांक 10 जून 2024 रोजी 4 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार ज्ञानराधा मल्टी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि आशिष पाटोदेकर यांच्या विरोधात दिली होती. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. असाच गुन्हा अंबड पोलीस ठाण्यातही नोंद करण्यात आलेला आहे. या सर्व फसवणुकीचा तपास जालना येथील आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना काल दिनांक 12 रोजी बीड येथील कारागृहातून ताब्यात घेऊन जालन्यात आणले होते आणि आज त्यांना न्यायालयात हजर केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172