सातेफळ च्या शाळेत शालेय पोषण आहारासोबतच शिजतंय राजकारण!
जाफराबाद- तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहारासोबतच आता राजकारणही शिजायला लागला आहे. शनिवारी शालेय पोषण आहारासाठी आणलेल्या पालेभाज्यांमध्ये आळ्या निघाल्याचा आरोप ग्रामस्थ प्रभू पाटील बनकर यांनी केला होता. त्यांनी शाळेत जाऊन भाजी निवडताना व्हिडिओ काढून तो व्हायरल ही केला होता. या प्रकरणाची सुनावणी आज जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या दालनात ठेवण्यात आली होती, परंतु तक्रारदारच वेळेत न आल्यामुळे केंद्रप्रमुख आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमती मीना यांनी या तक्रारीत काही तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
त्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील गावातील राजकारणामुळे हा प्रकार घडला आहे. खरे तर भाजी आणल्यानंतर ती निवडण्याचे, स्वच्छ करण्याचे काम चालू होते आणि हे चालू असतानाच प्रभू पाटील बनकर यांनी हा व्हिडिओ काढला आहे. भाजीपाला आणल्यानंतर तो निवडावाच लागतो आणि ते काम चालू असतानाच बळजबरीने हा व्हिडिओ काढला आहे, व्हिडिओमध्ये भाजीपाला निवडत असताना देखील महिला दिसत आहेत अशी माहिती शालेय समितीचे अध्यक्ष मारुती बनकर यांनी दिली आहे. शालेय समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा पराभव झाल्यामुळे गावात आता हे राजकारण होत आहे, परंतु आहारामध्ये कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नसून उत्तम प्रकारे शाळा चालू आहे असे मतही मारुती बनकर यांनी edtv news jalna यांच्यासोबत बोलताना व्यक्त केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172