… नाहीतर आम्ही तलावात उड्या मारू बरं का! शिक्षकांचा गर्भित इशारा
जालना- अंशता 20% 40% व 60 टक्के अनुदानित असलेल्या शाळा महाविद्यालयांना 1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा, या मागणीसाठी स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शाळा सुटल्यानंतर रोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत हे आंदोलन करण्यात येत आहे.
ज्या शाळांना 20 टक्के अनुदान आहे त्या शाळांना 40%, ज्या शाळांना 40 टक्के आहे त्या शाळांना 60% अशाप्रकारे दरवर्षी 20% अनुदान वाढीचा टप्पा लागू केल्याचा शासनादेश सरकारने जारी करावा अशी या शिक्षकांची मागणी आहे. यापूर्वी देखील वारंवार आंदोलने करण्यात आली आणि शासनाने आश्वासने देऊन ही आंदोलने मागे घेण्यास भाग पाडले. परंतु आता जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जालना शहरात असलेल्या मोतीबाग तलावात किंवा गोदावरी गंगेच्या प्रवाहात उड्या मारू असा इशारा स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने अनुदान मिळणारे महाराष्ट्र मध्ये 63 हजार शिक्षक आहेत तर जालना जिल्ह्यामध्ये सुमारे 4000 शिक्षकांची संख्या आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172