Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

आज मीच तुमचा गुरुजी आणि मीच तुमची बाई! श्री.व सौ. नोपानी दांपत्याचे ” लैंगिक अपराधांपासून बालकांच्या संरक्षणाचे शिक्षकांना धडे!

जालना- आज मीच तुमचा गुरुजी आणि मीच तुमची बाई असं म्हणत श्री. व सौ.नोपानीदांपत्याने जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षकांना लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 विषयी अवगत  केले आणि या बालकांचे कसे संरक्षण करायचे याविषयी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून धडे गिरवले त्यासोबत हा उपक्रम आता जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबवला जावा जेणेकरून लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण होईल अशी अपेक्षा देखील या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.

जालना पोलीस, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 म्हणजेच पोक्सो(pocso act 2012) याविषयी राबविण्यात येणाऱ्या मोहिमे संदर्भात जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षकांची कार्यशाळा सोमवारी पार पडली. या कार्यशाळेत बालकांचे लैंगिक अपराधांपासून कसे संरक्षण करावे? याविषयी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले तर मानसोपचार तज्ञ श्रीमती मानसी मोरे नोपनी यांनी किशोरवयीन अवस्थेत असलेल्या मुलांविषयीची मानसिकता काय आहे? आणि त्यांचे समाजातील अपराधांपासून कसे संरक्षण करायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस मोबाईलवर येणाऱ्या विविध मेसेज आणि लिंक संदर्भात होत असलेल्या फसवणुकीची माहिती जालना सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र चे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ उद्योजक घनश्यामजी गोयल यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे 400 शिक्षक आणि पोलीस प्रशासनातील दामिनी पथकाच्या महिला अधिकारी उपस्थित होत्या.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button