जालना-भोकरदन रस्त्यावर रात्री पुन्हा दोन अपघात; तीन अपघातांमध्ये आठ ठार, आठ जखमी
जालना/भोकरदन- जालना भोकरदन हा महामार्ग गुरुवार दिनांक 18 रोजी प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. दुपारी काळी पिवळी या वाहनाचा पहिला अपघात झाल्यानंतर रात्री पुन्हा दोन अपघात या रस्त्यावर झाले आणि एकूण तीन अपघातांमध्ये आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास पंढरपूरहून आलेल्या वारकऱ्यांना जालना बस स्थानकातून घराकडे घेऊन जाणाऱ्या काळी पिवळी वाहनाला दुचाकीने हुलकावणी दिल्यामुळे हे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत जाऊन पडले. यामध्ये उत्तम महाजन वय साठ वर्ष, नंदाबाई बाळू तायडे व पस्तीस, प्रल्हाद आनंद भेटले 65, नारायण किसन निहाळ 45, चंद्रभागाबाई अंबादास घुगे हे सर्व राहणार चनेगाव तालुका बदनापुर तर ताराबाई भगवान मालुसरे राहणार तपोवन तालुका भोकरदन आणि रंजना कैलास कांबळे वय 35 राहणार शास्त्री मोहल्ला जुना जालना हे ठार झाले आहेत आणि तीन जण जखमी झाले आहेत.
दुसरा प्रकरणात याच रस्त्यावर भोकरदन जवळ डावरगाव शिवारात एका खाद्य तेलाच्या टँकरला चार चाकी क्रमांक एम एच तेवीस एडी 43 63 ही स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या वाळूच्या ढिगावर जाऊन आदळली. समोरून येणाऱ्या खाद्य तेलाचे टँकर क्रमांक एम एच 04 जीआर 05 88 ला धडकली. या अपघातामध्ये भोकरदन तालुक्यातील शिरसागर येथे राहणारा संदीप गुलाबराव साबळे व वीस वर्ष हा तरुण ठार झाला आहे तर कार मधील इतर राजू बाबुराव साबळे 19 आणि दीपक प्रल्हाद लहुळकर वय 25 हे दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची कारवाई करून परत येत असतानाच रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास याच रस्त्यावर जालना पासून काही अंतरावर पुन्हा एक अपघात झाला पोलीस उपनिरीक्षक रामदास निकम यांना दिसला. पीर पिंपळगाव पाटीजवळ स्कार्पिओ क्रमांक एम एच 14 टी पी 7948 ही चार चाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 18 बी जी 31 97 ला पाठीमागून धडकली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे ,परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु कारचालक संदीप विष्णू वीर 27, ऋषीनाथ दंडगळ वय 25, आणि अशोक वीर 26 हे बावणे पांगरी येथील तरुण जखमी झाले आहेत .या तिन्ही अपघातांच्या ठिकाणी प्रभारी पोलिस अधिकारी रामदास निकम हे आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहिले आणि त्यांनी अपघाताविषयीची कारवाई पूर्ण केली.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172