Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

जालना शहर महापालिका झाली ?

जालना- जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन 7 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रश्न असा आहे की जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले का? जर कागदपत्रांच्या आणि शासनाच्या नियमानुसार विचारले तर हो झाले. परंतु महानगरपालिका झाल्यानंतर ज्या सोयी सुविधा, कर्मचारी वर्ग, आणि एकूणच आपण महानगरपालिकेच्या हद्दीत राहतो असे छाती ठोकपणे सांगणारा नागरिक आहे का? कदाचित याचे उत्तर नाही हेच आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, आरोप प्रत्यारोपानंतर, श्रेयवादा नंतर 7 ऑगस्ट 2023 रोजी शासनाने जालना पालिकेचे “जालना शहर महानगरपालिकेत” रूपांतर करून टाकले  खरे परंतु पुढे काय? वर्ष संपत आले परंतु आजपर्यंत एकही कर्मचारी महानगरपालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका म्हणजे “नाव  सोन्या हाती, मात्र तांब्याचा वाळा “नाव बदललं परंतु इतर कोणतीही गोष्ट बदललेली नाही .जालना नगरपालिकेच्या आस्थापनेवर त्यावेळी जेवढे कर्मचारी होते तेवढेच कर्मचारी आजही आहेत आणि या कर्मचाऱ्यांचा आकडा हा 400 च्या जवळपास आहे. महानगरपालिका झाल्यानंतर अनेक पदे इथे निर्माण केल्या गेली आणि त्या अनुषंगाने नवनिर्मित मंजूर पदांचा तपशील शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. सुमारे सहाशे नवनिर्मित पदे आहेत त्यामुळे ही कर्मचारी भरती जर झाली तर जालना शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 1000 कर्मचारी कार्यरत असणार आहेत .याशिवाय हंगामी कामगार हे वेगळे आहेत. हे कर्मचारी मिळावेत म्हणून जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे ,मात्र अद्याप पर्यंत या प्रस्तावाचा विचार केला गेला नाही. पुढील दोन महिन्यांमध्ये जर हे कर्मचारी भरल्या गेले नाहीत तर कदाचित विधानसभेची आचारसंहिता लागू होईल आणि पुन्हा जालना महानगरपालिकेची भरती रखडण्याची शक्यता आहे.

महापालिकेला जोपर्यंत कर्मचारी मिळत नाहीत तोपर्यंत कुठलीही योजना, कुठलीही सुविधा आणि नवीन प्रकल्प येणे कठीण आहे. कारण आहे ते मनुष्यबळ “माणसाळलेले” आहे .एखादी योजना एखादी कारवाई करायचे म्हटले तर प्रत्येकाचे हितसंबंध आडवे यायला लागतात आणि त्यामुळे कामच होत नाही. परंतु मागणी केलेले 600 कर्मचारी आले तर प्रत्येकावर जबाबदारी निश्चित केली जाईल आणि एकंदरीतच जबाबदारीच्या भीतीपोटी हे अधिकारी कामे करायला लागतील. शेवटी काय तर आज जे चारशे कर्मचारी कार्यरत आहेत त्यामध्ये आणखी सहाशे कर्मचाऱ्यांची जर भर पडली तर महानगरपालिकेची ताकद आणि जबाबदारी वाढेल आणि यातून जालना शहराचा विकास होईल .नवीन पद मंजुरी मध्ये काही महत्त्वाची पदे आहेत त्यामध्ये पशुसंवर्धन अधिकारी, खरेदी पर्यवेक्षक, दफनभूमी/ स्मशानभूमी व्यवस्थापक ,सभागृह /नाट्यगृह मिळकत व्यवस्थापक, कोंडवाडा/ लिपिक, सुरक्षारक्षक ही काही अशी पदे आहेत या कर्मचाऱ्यांनी जर ठरवले तर शहरातील वाहतूक सुरळीत होऊन उत्पन्नही वाढेल. सध्याच्या जमान्यात टेलिफोन हा इतिहास जमा झालेला आहे परंतु असे असतानाही नवीन पद निर्मितीमध्ये टेलिफोन ऑपरेटर च्या चार जागा मंजूर करण्यात आल्या आहेत.

अ ब क ड या आहेत वेतनश्रेणी अशी आहे वेतनश्रेणी अ गटामध्ये आयुक्तांची वेतनश्रेणी येते आणि ही वेतन श्रेणी शासन निश्चित करते त्यांच्यासोबत याच गटात विद्युत आणि यांत्रिकी असे दोन उपअभियंता देखील येतात आणि या दोन्ही उपाभियत्याची वेतनश्रेणी आहे 56 हजार एकशे एक लाख 77 हजार पाचशे .ब गट वेतनश्रेणी ,या गटामध्ये एकूण 14 पदे भरण्यात येणार आहेत या गटाची वेतनश्रेणी आहे 418 00 ते 1 लाख 32 हजार 300. क गट, एकूण 197 पदे भरण्यात येणार आहेत आणि या गटाची वेतनश्रेणी आहे 38 हजार 600 ते एक लाख 22 हजार 800. ड गटामध्ये ,259 पदे भरण्यात येणार आहेत आणि या गटाची वेतन श्रेणी आहे 15000 ते 56 हजार 900 त्यामुळे जालना महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पदावर तुमची कर्मचारी म्हणून भरती झाली तर किमान 40 हजार रुपये महिना तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे .अशा वेगवेगळ्या गटांमधील 473 पदांना शासन निर्णय जापमा -2022/ प्र क्र/ 131 नवी -17 दिनांक 22 ऑगस्ट 2023 अन्वये मंजुरी दिलेली आहे परंतु अद्याप पर्यंत हे पदे भरल्या गेलेली नाहीत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button