पाच महसूल कर्मचाऱ्यांवर चालू आहे जिल्ह्याचा कारभार; महसूल कर्मचाऱ्यांना “अव्वल कारकून” शब्दाची ऍलर्जी

जालना- जालना जिल्ह्यात 10 जुलैपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. खरं तर हा संप पुकारण्यापूर्वी या कर्मचारी संघटनेने राज्य शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन आपल्या मागण्याही कळवलेले आहेत. जालना जिल्ह्यात या संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे कार्याध्यक्ष रवींद्र हेलगट आणि सचिव अरुण डुकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संपाचा इशारा दिला होता. परंतु शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून या कर्मचाऱ्यांनी दिनांक दहा रोजी काळ्याफिती लावून काम केले, दिनांक 11 रोजी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली, दिनांक 12 रोजी लेखणी बंद आंदोलन केले यावरही शासनाने काहीच तोडगा न काढल्यामुळे दिनांक 15 जुलै पासून या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दांगट समितीने केलेल्या शिफारशींचा अहवाल लागू करावा तसेच महसूल विभागात काम करत असताना वेगवेगळ्या पदांना वेगवेगळी नावे आहेत त्यानुसार “अव्वल कारकून” हे नाव कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वाटत आहे आणि याची टिंगल टवाळी देखील केल्या जाते .त्यामुळे अव्वल कारकून हे नाव बदलून “सहाय्यक महसूल अधिकारी” असे संबोधावे अशा एकूण 15 मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत.
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अव्वल कारकून 104, पूर्व रजा देऊन गेलेले कर्मचारी पाच, संपात सहभागी झालेले अव्वल कारकून 86. महसूल सहाय्यक एकूण 125, पूर्व रजा देऊन गेलेले चार, संपात सहभागी 109. आणि कार्यालयात उपस्थित तीन. एकूण शिपाई 59 पूर्व रजा देऊन गेलेले तीन आणि संपात सहभागी झालेले 54 तर दोन उपस्थित आहेत. जालना जिल्ह्यामध्ये अशा एकूण 288 महसूल कर्मचाऱ्यांपैकी 12 कर्मचाऱ्यांनी पूर्व रजा दिलेले आहे. 259 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत तर पाच कर्मचारी हे कार्यालयांमध्ये उपस्थित आहेत.
* आपल्या पाल्यावर लैंगिक अत्याचार तर होत नाही ना ? काय आहे सध्या परिस्थिती पहा पुढील बातमीत .
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172