Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाबाल विश्वराज्य

लैंगिक अपराधांपासून आपल्या बालकांचे करा संरक्षण; समाजात आहे “ही” भयावह स्थिती भाग-1

जालना- आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये अपराध करण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल होत आहे. सध्या समाजाला भेडसावणारी एक मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कसे करायचे? हा सर्वच समाजाला भेडसावणारा प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस हा प्रश्न वाढत जात आहे. तो फक्त एका विशिष्ट समाजामध्ये, विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट जातीमध्येच आहे असे नाही, हा सर्वांनाच लागलेला आजार आहे .त्यामुळे राज्य शासनाने या “लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण  अधिनियम- 2012” म्हणजेच पोक्सो-2012 हा कायदा तयार केला आहे . बालकांसोबत झालेल्या लैंगिक अत्याचारामध्ये म्हणजेच बलात्कारामध्ये 10 बलात्कार हे वडिलांनीच आपल्या मुलीवर केले आहेत. अकरा बलात्कार हे पतीने आपल्या पत्नीवर केले आहेत तर इतर प्रकरणांमध्ये 59 बलात्कार झाल्याची अधिकृत नोंद पोलीस दरबारी आहे. त्यामुळे आपण कुठल्या दिशेने जात आहोत हे विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहते . या कायद्याची जनजागृती व्हावी बालकांचे संरक्षण होऊन पालकांना देखील दिलासा मिळावा म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाने अशा अपराधांपासून सुटका व्हावी म्हणून जनजागृती हाती घेतले आहे.  या संदर्भात नुकत्याच जिल्ह्यातील 400 शाळांच्या शिक्षकांना अपराध कसे होतात? त्यातून बाहेर कसं पडायचं! त्यावर काय उपचार! आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले त्यामधीलच हा पहिला भाग. अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत पाहूयात.

अठरा वर्षाखालील सर्व मुला मुलींना बालक असे म्हणावे. सन 2023- 24 मध्ये जालना जिल्ह्यामध्ये  बलात्काराचे 81 मुले बळी ठरले आहेत आणि 125 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. या 81 बळी पडलेल्या  मुलांमध्ये वय नऊ जणांचे बारा वर्षापेक्षा कमी होते, 36 जणांचे 12 ते 16, तर 16 ते 18 दरम्यान आणखी 36 जण असा हा वयोगट आहे. आता हा अपराध करणाऱ्यांमध्ये म्हणजेच 125 आरोपींमध्ये 18 वर्षाखालील 18 ते 21 वयोगटातील 34, 21 ते 30 वयोगटातील 48 आणि 30 वर्षांपुढील 35 जणांचा समावेश आहे .आता हे चित्र मात्र भयाव आहे जे 125 आरोपी आहेत त्या आरोपींमध्ये विश्वासाने शेजाऱ्यांसोबत राहणारे किंवा शेजारीच 16 आरोपी आहेत, अनोळखी एक आहे, 28 हे बॉयफ्रेंड म्हणजेच मित्र आहेत ज्यांनी विश्वास संपादन करून बलात्कार केले. सुदैवाने यामध्ये एकाही शिक्षकाचा समावेश नाही. पोटच्या पोरीवर बलात्कार करणाऱ्या दहा वडिलांचा यामध्ये समावेश आहे. 11 पतीने आपल्याच पत्नीवर बलात्कार केला आहे. असे हे 125 आरोपी वर्षभरामध्ये निष्पन्न झाले आहेत. याची कारणे देखील तपासण्यात आली त्यानुसार 15 प्रकरणांमध्ये हा गर्भधारणेचा प्रकार आहे. 35 प्रकरणात कामधंदा मिळवून देण्यासाठी, नऊ प्रकरणेही निष्पन्न झाली नाहीत, वादग्रस्तांमध्ये तीन प्रकरण आहेत .एकटे बालक पाहून त्याच्यावर बलात्कार करण्याचे पाच प्रकार आहेत तर बालविवाहाचे 14 प्रकार आहेत. सन 2023 मध्ये 32 मुले आणि 113 मुली तर 2024 मध्ये आतापर्यंत वीस मुले आणि 77 मुलींचे अपहरण झाले आहे.

हे सर्व सांगण्यामध्ये आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यामध्ये शाळांची भूमिका काय हे देखील समजावून घेणे महत्त्वाचे आहे. कारण अठरा वर्षाखालीलच बालके या शाळांमध्ये असतात. त्यामुळे शिक्षकांना देखील याविषयीचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाय शिक्षकांना सांगितले आहेत, त्यानुसार माहितीच्या देवाण-घेवांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, बालकांना स्वतःची सुरक्षा करणे व काही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबत तात्काळ माहिती कळवण्याबाबत प्रबोधन करणे, शाळेतील कर्मचारी, पायाभूत सुविधा यांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. पीडित बालकाला  कसे ओळखावे, हा देखील एक प्रश्न शिक्षकांसमोर असतो त्यावर पर्याय म्हणजे बालकांच्या संवेदनशील भागावर जखमा होतात, त्याला चालण्यास अडचण होते, वारंवार थकवा जाणवतो, वर्गामध्ये बहुतांश अनुपस्थित असतो, त्याच्या वागण्यात बदल दिसतो, आणि नेहमी आवडणारी एखादी व्यक्ती अचानक त्या व्यक्तीबद्दल राग निर्माण होतो. शिक्षकांनी अशा वेळी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करावी, पोलिसात तक्रार द्यावी असे  आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांनी अशा पिडिते बाबत गोपनीयता बाळगावी, मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098 यांची मदत घ्यावी, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवावा, बालकांना पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रवाहात आणण्यासाठी इतरांसमोर अशा पीडित बालकाची ओळख उघड करू नये, बालकासमोर त्याच्यावर घडलेल्या प्रसंगाबाबत इतरांशी चर्चा करू नये आणि अशा परिस्थितीत बालक जर बोलत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे. पीडितला आरोपीकडे परत पाठवू नये, बालकाला दोष देणे आणि त्यावर ओरडणे थांबवावे एखादा अपराध घडलेला आहे आणि तो माहित आहे अशा अपराधाचे वृत्त देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये हे बंधन पालक शाळा शिक्षक हॉस्पिटल डॉक्टर सज्ञान व्यक्ती सामान्य नागरिक आणि लोकसेवक म्हणजेच प्रत्येकावर ते बंधनकारक आहे.

पुढच्या भागात पहा मानसोपचार तज्ञ मानसी मोरे लोकांनी यांनी या विषयावर काय उपाय सांगितले आहेत

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button