अवघ्या दहा मिनिटात झाला ई- बाईकचा कोळसा
जालना- जुना जालना भागात असलेल्या कै. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलामध्ये सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काही तरुण रोजच्या प्रमाणे खेळण्यासाठी आले होते. त्यापैकीच एकाकडे एक ई- बाईक होती. बाजारामध्ये 40 हजारात मिळणाऱ्या ई- बाईक पैकी ही बाईक होती. गाडी उभी करताच अवघ्या दोन मिनिटातच या गाडीला आग लागली आणि पुढील दहा मिनिटांमध्ये या गाडीचा कोळसा झाला. गाडीची किंमतही तशी फारशी नसल्यामुळे गाडी मालकाने देखील तिला विझवण्याचा प्रयत्न केला नाही.
दरम्यान अशा वाहनांची सध्या बाजारात रेलचेल आहे. तूर्तास 45 हजारांमध्ये अशा प्रकारची नवीन गाडी मिळते. त्यासोबत या गाडीचा 4800 रुपयांमध्ये विमा ही उतरविला जातो. त्यामध्ये एक वर्षासाठी गाडी मालक आणि गाडीचा विमा असतो तर पुढील चार वर्षांसाठी थर्ड पार्टी विमा असतो .त्यामुळे अशा गाड्या वर्ष दोन वर्ष वापरून फेकून देणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. परंतु उन्हाळा नसतानाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उभ्या गाडीला आग लागणे ही एक चिंतेची बाब आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172