जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांची वर्षपूर्ती ; मी हे केलं! हे करणार! सडेतोड प्रश्नांची सडेतोड उत्तरे, पहा विशेष मुलाखत
जालना- भारत प्रशासन सेवेतील अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून जालना येथे जिल्हाधिकारी पदावर दिनांक 22 जुलै 2023 रोजी बदली झाली . मावळते जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून त्यांनी सूत्र स्वीकारली. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आहे.
जिल्हाधिकारी झाल्यानंतर जशी अधिकारांमध्ये वाढ होते तशीच कर्तव्य आणि जबाबदारी देखील वाढते. जिल्ह्याचा प्रशासकीय अधिकारी या नात्याने सर्वच यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येते त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवणे हे प्रथम कर्तव्य जिल्हाधिकाऱ्यांचे होते, फक्त समस्या सोडवणे नव्हे तर विकास कामे राबविणे, ध्येयधोरणे राबविणे रोजगार निर्मिती करणे आणि जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था राखणे याचा देखील त्यामध्ये समावेश होतो. मागील वर्षभरामध्ये जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ यांनी काय करण्याचे ठरवले होते? काय केले? काय राहिले? काय करणार? अशी सर्व सडेतोड प्रश्न वर्षपूर्तीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांना जालनेकरांच्या वतीने esto news ने विचारली आणि त्याच तोडीचे उत्तरे देखील डॉ पांचाळ यांनी दिली. समस्या आणि त्याचे निराकरण हे तर होतच राहते परंतु त्यांनी एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे . मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी हा प्रकल्प राबविल्या जाणार आहे आणि तो म्हणजे “महादीप”. या महादिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 50 विद्यार्थ्यांना फेब्रुवारी 2026 मध्ये पहिली विमान वारी देखील होणार आहे. काय आहे प्रकल्प आणि इतर समस्यांबद्दल काय उत्तर दिली सविस्तर पहा डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मुलाखतीमध्ये.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172