Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

ज्ञानराधा मल्टी स्टेट;आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटेच्या पुन्हा एकदा आवळल्या मुसक्या

जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते आणि त्या अनुषंगाने जालन्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला होता. सध्या या शाखेकडे 2000 गुंतवणूकदारांनी आपली तक्रार नोंदविली आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर या दोघांना जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड न्यायालयाच्या परवानगीने दिनांक 12 जुलै रोजी रात्री नऊ वाजता जालन्यात आणले होते. या दोघांना दिनांक 13 रोजी न्यायालयात उभे केले असता सुमारे सहा तास युक्तिवादानंतर  न्यायालयाने रात्री नऊ वाजता निकाल दिला आणि या दोघांना इथे आणण्यामध्ये तांत्रिक अडचण आहे त्यामुळे परत नेऊन सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुन्हा आर्थिक गुन्हा शाखेचे  उपाधीक्षक रमेश जायभाये आणि तपासी अधिकार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी कंबर कसली आणि पुन्हा एकदा दिनांक 25 रोजी बीड न्यायालय गाठले.  या आरोपींना चौकशीसाठी ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी मात्र पोलिसांनी सर्व खबरदारी घेतली आहे. या आरोपींच्या प्रवासाची देखील परवानगी पोलिसांनी काढली आहे. त्यामुळे आता जालनेकरांना कोट्यावधी रुपयांना चुना लावणाऱ्या या सुरेश कुठे यांना शुक्रवार दिनांक 26 रोजी न्यायालयात उभे केले जाणार आहे.(dnyaradha multy state)

बीड येथे मुख्य शाखा असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या वित्तीय संस्थेने मराठवाड्यात विविध ठिकाणी शाखा उघडल्या.  या शाखेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक परत करू शकले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. माजलगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे वय 48 वर्ष राहणार कुटेवाडी जिल्हा बीड, आणि संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर वय 32 राहणार पाटोदा यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची बीड कारागृहात रवानगी करण्यात आली होती.अशाच प्रकारची फसवणूक केल्याचा गुन्हा जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता आणि त्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आणि सर्वांनीच जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत .आजच्या परिस्थितीमध्ये सुमारे साडेनऊशे तक्रारींची नोंद इथे करण्यात आली आहे. आर्थिक गुना शाखेच्या कार्यालयासमोर पायऱ्यावर बसून अनेक गुंतवणूकदार आपली तक्रार नोंद करत आहेत. जालन्यातील हा आकडा 40 कोटींच्या आसपास  जात आहे.

यावेळी कुठे आणि पाटोदेकर यांना आणण्यासाठी आर्थिक गुना शाखेचे उपाध्यक्ष रमेश जायभाय तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्यासह  समाधान तेलंग्रे, गोकुळसिंग कायटे, चंद्रशेखर मांटे, रवी गायकवाड, गजू भोसले, फुलचंद घुसिंगे, निमा घनघाव, मंदा नाटकर, जया निकम, रामसिंग चव्हाण हे सर्वजण या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फसवणुकी संदर्भात तपास कामी कार्यरत आहेत.

यापूर्वी पैठण पोलीस ठाण्यात देखील ज्ञानराधा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि ही रक्कम 25 कोटी 32 लाखांची असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button