अनाधिकृत शाळा; श्री चैतन्य टेक्नो स्कूलला शिक्षण विभागाचे सील
जालना -शहरात उच्चभ्रू वस्तीत असलेल्या संभाजीनगर भागातील श्री. चैतन्य टेक्नो स्कूल ला जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवार दिनांक 25 रोजी सील ठोकले आहे.शासनाच्या परवानगीशिवाय ही शाळा सुरू असल्यामुळे या शाळेला अनाधिकृत शाळा म्हणूनही घोषित करण्यात आले आहे .या संदर्भातील जाहीर सुचनेचे फलक शाळेसमोर लावण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे यांनी ही कारवाई केली.
अनधिकृत शाळा सुरू असल्यास बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18( 5) च्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांना संबंधित शाळेच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये इतका दंड करण्याचा व दंड करूनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये आणखी दंड ठोठावण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान या शाळेमध्ये सध्या पहिली ते सातवी वर्गामध्ये 180 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 25 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येथे कार्यरत आहेत. पहिलीच्या वर्गाची एका वर्षाची फी 40 हजार रुपये घेतल्या जाते. विद्यार्थ्यांची ही फी परत करून या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये प्रवेश देण्याच्या सूचनाही या शाळेच्या व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172