ज्ञानराधा;सुरेश कुटेला पुन्हा आणून पोलीस कोठडी मिळविण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश
जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक पाटोदेकर यांना आर्थिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल दिनांक 25 रजी रात्री नऊ वाजता बीड कारागृहातून जालना येथे आणले होते. आज मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कुटे यांना न्यायालयात हजर केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.जी. अडके यांनी दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कुटे आणि पाटोदेकर या दोन्ही आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .दरम्यान खटल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी न्यायालयाला दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. तसेच कुटे यांनी आत्तापर्यंत 34 शाखांच्या माध्यमातून किती अपहार केला आहे? याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचे म्हटले होते. तशी मागणी देखील जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांच्या माध्यमातूनही न्यायालयाला केली होती. न्यायालयाने ही मागणी 30 तारखेपर्यंत मंजूर केली आहे. कुटेला न्यायालयात आणतांना मोठा पोलीस बंदोबस्त होता .तसेच न्यायालयात देखील गुंतवणूकदार मोठ्या संख्येने जमा झाले होते.
यापूर्वी देखील कुटे आणि पाटोदेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिनांक 12 रोजी जालन्यात आणले होते त्या वेळची घटना ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे नव्हती त्यामुळे न्यायालयाने या दोन्ही आरोपींना बीड कारागृहात नेऊन सोडण्याचे आदेश दिले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पूर्ण प्रक्रिया करून पुन्हा आणण्यास परवानगी दिलेली होती. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक रमेश जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सुरवसे यांनी पुन्हा कंबर कसून आर्थिक गुन्हे शाखेतील सहकाऱ्यांसह सर्व प्रक्रिया पूर्ण करून काल रात्री नऊ वाजता जालना येथे आणले होते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172