“या” प्रश्नावर झाली शांत संयमी जयंत पाटलांची गोची; तर आ.टोपेंनी जोडले हात
जालना- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात नुकताच निष्ठावंत संवाद हा कार्यक्रम पार पडला .त्यांच्या जोडीला आणखी एक शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणारे राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती. या मेळाव्यात विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक उमेदवार इच्छुक होते. एक दुसऱ्याला चिमटे घेत कोपरखळ्या मारत आणि सत्ताधाऱ्यांवर तोंड सुख घेत हा “निष्ठावंत संवाद” संपला. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे मात्र जयंत पाटलांची चांगलीच गोची झाली. त्यांची गोची झालेली पाहून आमदार राजेश टोपे यांनी उत्तर द्यावं अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली .परंतु टोपेंनी तर हातच जोडले. नेमका काय होत हा प्रश्न? पहा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172