ज्ञानराधा; सुरेश कुटेची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत
जालना; ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर हे जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात होते. दिनांक 24 रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या सुनावणी दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी असलेली कुटेची मालवाहू 15 वाहने जप्त केली होती आणि अजूनही तपास करायचा आहे त्यामुळे कुटेची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणीही केली होती. परंतु न्यायालयाने ती अमान्य केली आणि सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे आता सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर हे पुन्हा जिथून आले तिथेच म्हणजेच बीडच्या कारागृहात पाठविले जाणार आहेत.
दरम्यान मराठवाड्यात जालना, बीड ,परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये ज्ञानराधाच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे जालन्याहून जरी कुटे आणि पाटोदेकर यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी आता इतर जिल्हे पुन्हा या दोघांची चौकशीसाठी मागणी करू शकतात. तसेच या दोघांना जालन्यात आणून जी चौकशी केली आहे ती फक्त सदर बाजार पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भातच केलेली आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस पुन्हा एकदा अंबड येथे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांची मागणी न्यायालयाकडे करू शकतात.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172