लोणार- नाशिक बस आणि ट्रकचा जालन्याजवळ भीषण अपघात
जालना- नाशिक आगाराची लोणार -नाशिक बस क्रमांक एम एच 14 बीटी 50 66 आणि ट्रक क्रमांक एम एच 21 एक्स 33 21 या दोन वाहनांचा आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जालना शहरा जवळील नाव्हा चौफुली परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसमधील सुमारे 20 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे .नाशिक आगाराची ही बस रोज रात्री 10 वाजेच्या सुमारास लोणार ला पोहोचते आणि पुन्हा तीच दुसऱ्या दिवशी पहाटे नाशिककडे निघते. परंतु काल ही बस नादुरुस्त झाल्यामुळे सिंदखेड राजा वरून लोणार ला गेलीच नाही. सिंदखेड राजा येथेच या बसने मुक्काम केला आणि सकाळी सात वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा वरून पुन्हा नाशिककडे परतीच्या प्रवासाला निघाली. दरम्यान या प्रवासामध्ये नाव्हा चौफुली वरून कन्हैया नगर मार्गे जालना बस स्थानकाकडे येत असताना वनविभागाच्या रस्त्यावर या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला.
या अपघातामध्ये बसचे चालक अंकुश दामोदर आव्हाळे वाहक अजित घुमरे दोघेही राहणार नाशिक यांच्यासह सिंदखेडराजा येथील पंढरी विठोबा डोईफोडे, प्रतीक विठोबा डोईफोडे, कविता पंढरी डोईफोडे ,तसेच गयाबाई आसाराम हरकळ, सुलोचना किशन परमाळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत पूजा मस्के, रिजवान कुरेशी फर्जना सय्यद चांद ,सुरेश शामराव डोळे ,ज्योती कारभारी कोरे,रा. माळसावरगाव, भाऊसाहेब लक्ष्मण आगवणे , सुमित्रा राजू जाधव ,राहणार सिंदखेड राजा, सुभाष अनिल अंभोरे, मंदाबाई भाऊसाहेब आगलावे ,विमलबाई महादू काळे हे प्रवासी जखमी झाले आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172