जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये स्वच्छता मोहिम

जालना- राज्य शासनाने दिनांक एक ते 15 ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवाडा साजरा करण्याचे ठरवले आहे .या अनुषंगाने दिनांक 30 जुलै रोजी शासनाने एक निर्णय काढला आहे, आणि त्या निर्णयानुसार पंधरा दिवसात आपापल्या वेळेनुसार आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम राबवायचा आहे .
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक चार रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये सोमवारी विविध कार्यालयांची स्वच्छता करण्याचे ठरले. त्यानुसार आज दिनांक पाच रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या महसूल, सामान्य प्रशासन, गृह विभाग, गौण खनिज, नगर रचना विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, मुद्रांक शुल्क जिल्हा मानव विकास अधिकारी कार्यालय, या व इतर विभागांची देखील अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली .वर्षानुवर्ष संचिकेचे पडलेले गठ्ठे, त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आणि धूळही झटकण्यात आली. या उपक्रमावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ ,अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार हे लक्ष देत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172