ज्ञानराधा प्रकरण; चार कोटींच्या फसवणूक प्रकरणी करमाडला गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी बीड या शाखेच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी शाखा आहेत. यापूर्वी बीड ,माजलगाव, जालना ,वैजापूर ,परभणी, पैठण, येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील करमाड पोलीस ठाण्यात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या जिल्ह्यातील दुधड येथील रहिवासी पांडुरंग शेषराव चौधरी यांनी करमाड पोलीस ठाण्यात दिनांक आठ ऑगस्ट रोजी तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की सन 2016 -17 पासून या शाखेच्या वतीने कर्मचारी आणि संचालकांनी परिसरातील सुमारे 200 ठेवीदारांना जास्त पैशाचे आम्हीच दाखवून ठेवी ठेवण्यास भाग पाडले .अनेक शेतकऱ्यांनी मुदती ठेवी देखील ठेवल्या आहेत. या ठेवींची मुदत संपल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या ठेवी परत घेण्यासाठी बँकेत गेले असता त्यांना ती रक्कम मिळत नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली आहे. सुमारे 200 ठेवीदारांच्या चार कोटी 16 लाख 14 हजार 328 रुपयांची रक्कम होते. अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या परंतु त्या तक्रारींची चौकशी करण्यात वेळ गेल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172