गैरप्रकार करणाऱ्या संस्थाचालकांच्या विरोधात परीक्षा मंडळाने कंबर कसली – परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे

जालना- दहावी आणि बारावीच्या धरतीवर टायपिंगच्या परीक्षेत देखील विद्यार्थ्यांना पुन्हा महिनाभरामध्ये परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, चिखली आणि शहादा येथे टायपिंगच्या परीक्षेत झालेले गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे .दरम्यान या दोन्ही परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली आहे अशी माहिती पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.
टायपिंग, टीईटी,डीएड, nmms, शिक्षक पात्रता परीक्षा ,सह इतर अन्य परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य शासनाने (भारतीय प्रशासन सेवा) आयएएस दर्जाचे पुणे येथील अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांची परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे .या नियुक्ती संदर्भात त्यांचा सत्कार आणि जालना जिल्हा संस्थाचालकांच्या मेळाव्याचे आयोजन जालन्यात नुकतेच करण्यात आले होते .याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे, महासचिव संतोष दाणी कार्याध्यक्ष संजय नाईक, यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी वीरकुवर गोवर्धन ,शैलेंद्र पाटील, अरुण चव्हाण, परीक्षा परिषदेचे संगणक अभियंता नितीन किर्द आदींची उपस्थिती होती.
दरम्यान या संदर्भात डॉ.नंदकुमार बेडसे यांनी राज्यभरातून आलेल्या संस्थाचालकांना सविस्तर मार्गदर्शन केले .तसेच विद्यार्थ्यांना आणि संस्थाचालकांना येणाऱ्या अडचणी संदर्भातही केलेल्या उपाययोजना विषयी माहिती सांगितली.दरम्यान मराठी आणि इंग्रजीची टायपिंगची परीक्षा दिल्यावर एका विषयात जरी विद्यार्थी नापास झाला तरी त्याला पुढील सहा महिने दुसऱ्या परीक्षेची वाट पाहावी लागत होती. परंतु आता यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे, आणि ज्या विषयात विद्यार्थी नापास झाला आहे त्याला पुढील महिनाभरात फक्त तेवढ्याच एका विषयाची परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. संस्थाचालक विविध प्रकारच्या पळवाटा काढून आपल्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी नवनवीन युक्त्या आजमावतात. त्याला आळा घालण्यासाठी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यावर बेडसे यांनी भर दिला. दरम्यान अनेक संस्था चालक विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देऊन काही येत नसेल किंवा काही अडचण आली तर संगणक बंद करण्याचा सल्ला देतात जेणेकरून यामधील त्रुटी आढळून आल्यावर संस्थाचालक यंत्रणेच्या माती माती खापर फोडतात आणि रोष व्यक्त करतात या प्रकाराला आळा घालण्यासाठी देखील संगणक बंद पडू नये किंवा चुकीचे बटन दाबले जाऊ नये यासाठी परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले असल्याचेही ते म्हणाले त्याही पुढे जाऊन भविष्यामध्ये विद्यार्थी कोणते बटन दाबत आहे ते परीक्षा परिषदेला देखील पाहता येईल या अनुषंगाने देखील नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचेही ते म्हणाले. यामध्ये महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लघुलेखन परीक्षा ही संगणकावर घेणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य असल्याचा गौरवोद्गारही त्यांनी काढले,आणि वर्षानुवर्ष खडखळ करणाऱ्या मशीनवर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना परीक्षेला बसवून फी उकळणाऱ्यचा संस्थाचालकांना आळा घालण्यासाठी या टाईपराईटर ची परीक्षा आणि प्रशिक्षण बंद करावे यासाठी आपण शासनाकडे अहवाल दिला आहे आणि त्यावर लवकरच निर्णय होईल असेही ते म्हणाले.
यापूर्वी टायपिंगची परीक्षा देणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला अमृत योजनेचा लाभ मिळत नव्हता म्हणजेच या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जी फी परत मिळायची ती मिळत नव्हती परंतु आता नवीन निकषानुसार अमृत योजनेमध्ये देखील या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी पास झाल्यानंतर त्याला या योजनेतून संस्था चालकांनी घेतलेली फी त्याच्या खात्यात जमा होणार आहे.दरम्यान जून मध्ये माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात चिखली आणि शहादा येथे झालेला टायपिंग परीक्षा घोटाळ्यातील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली आहे. तसेच या महाविद्यालयांवर कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती देखील डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे महासचिव संतोष दाणी यांनी केले तर सूत्रसंचालन संजय फलटणकर यांनी केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172