58 गुन्हे, तीन जिल्ह्यात वांटेड असलेले दोन आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या ताब्यात ;देवमूर्ती येथे भर दिवसा टाकला होता दरोडा
जालना- 58 गुन्हे आणि तीन जिल्ह्यात वांटेड असलेले जालन्यातील दोन आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रविवार दिनांक 11 रोजी तिघांनी मिळून देवमूर्ती येथील विठ्ठल तुकाराम चव्हाण यांच्या घरी दरोडा टाकला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत अवघ्या काही तासांमध्येच या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे .
आरोपी अर्जुन सिंग छगनसिंग भोंड वय 24 वर्ष राहणार गुरुगोविंद सिंग नगर जालना आणि सागरसिंग फंटासिंग अंधेरेले उर्फ बावरी व चोवीस वर्षे राहणार हरी गोविंद रेसिडेन्सी सरस्वती मंदिराजवळ जालना. यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून या दोघांचाही बुलढाण्यापर्यंत पाठलाग केला दरम्यान हे दोन्ही आरोपी बुलढाण्याहून पुन्हा जालन्याकडे परतले असल्याची माहिती मिळाली आणि या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कन्हैया नगर परिसरामध्ये सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीमध्ये गेलेल्या सोने, चांदी, रोख रक्कम असा एकूण सात लाख 14 हजार 380 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार गुन्हेगार आहेत. यापैकी बावरी या रोपावर 31 गुन्हे दाखल आहेत तर अर्जुनसिंग भोंड याच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. असे एकूण या दोघांवर 58 गुन्हे दाखल आहेत आणि ते तीन जिल्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. दरम्यान जालना हा चौथा जिल्हा आहे जिथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघांना पकडले आहे आणि तिसऱ्याचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे ,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, कृष्णा तंगे ,देविदास भोजने, लक्ष्मीकांत आडेप, आदी अधिकारी कर्मचाऱ्यांचा या तपासामध्ये सहभाग होता.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172