तलावाच्या सांडव्यात प्लॉटिंगचे प्रकरण; जि. प. समोर 80 वर्षांच्या आजोबांची आर या पारची लढाई
जालना- अंबड तालुक्यातील ताड हादगाव येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आहे .या तलावातून सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या जागेवर गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधले आहेत. आणि प्लॉटिंग करून भूखंड ही विक्री केले आहेत. पर्यायाने या सांडव्यातून वाहत जाणारे पाणी हे दुसऱ्या मार्गाने वाहत जात असल्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या घरामध्ये आणि जमिनीमध्ये हे पाणी जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवावे आणि पाण्याला वाट काढून द्यावी या मागणीसाठी गावातीलच कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्र हे 80 वर्षाचे आजोबा जिल्हा परिषदेसमोर दिनांक 13 पासून उपोषणाला बसले आहेत.
यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला जून 2022 पासून अनेक वेळा विनंती अर्ज तक्रारी प्रत्यक्ष भेटी देऊनही काहीच उपयोग झाला नाही अधिकारी गावात येतात आणि प्लॉटिंग वाल्यांची हात मिळवणी करून परत फिरतात असा आरोपही या आजोबांनी केला आहे दरम्यान जोपर्यंत या अतिक्रमण धारकांवर कारवाई होत नाही आणि सांडव्याचे पाणी नियोजित जागेतून काढून दिला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धारही या आजोबांनी केला आहे त्याच सोबत आपण वारंवार करीत असलेल्या तक्रारी आणि उपोषण यामुळे अतिक्रमण केलेल्या लोकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही ठामपणे ते सांगत आहेत आणि जीवाचे काही बरे वाईट झाले तर लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी याला जबाबदार असतील असेही ते म्हणाले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172