Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आता जेईएस मध्ये भागणार संगीत,नाट्य, नृत्याची तहान

जालना :येथील जेईएस महाविद्यालच्या ललित कला अकादमीचे उद्घाटन सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडीत विश्वनाथ ओक आणि विश्वनाथ दाशरथे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी पंडीत विश्वनाथ दाशरथे यांच्या संगीत मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया हे होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, गायक पंडित विश्वनाथ ओक, पंडीत विश्वनाथ दाशरथे, डॉ. मोहिनी रायबागकर, मराठी विभागाचे प्रमुख तथा समन्वयक डॉ. यशवंत सोनुने, लोककला विभागाचे प्रमुख प्रा. कल्याण उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी ललित कला अकादमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेल. आजच्या युवकांच्या मनामनात संगीत,नाट्य नृत्याची आवड निर्माण व्हावी. त्यांना जीवनात चांगल्या गोष्टीचा छंद असेल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी सांस्कृतिक वातावरण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ललित कला अकादमीच्या माध्यमातून होणार असल्याचे  सांगितले.


आपल्या उद्घाटनपर भाषणात पंडीत विश्वनाथ ओक म्हणाले की , की पूर्वीच्या काळी संगीताला राजाश्रय होता. परंतु आता परिस्थिती बदलली असल्याचे सांगून संगीत हे आत्मीय आनंदासाठी असायला हवे. संगीत विषयाचा अभ्यास करण्यापेक्षा ‘रियाज’ असायला पाहिजे, असेही श्री. ओक यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पंडित विश्वनाथ दाशरथे म्हणाले की, ललित कला अकादमीतून शिकत असताना स्व घरी सेवक, गुरु घरी साधक आणि रंगमचावर कलाकार म्हणून रहावे. गुरुचा विश्वास जपत समर्पण भावना मनात नव्याने शिकत असताना जोपासता आली पाहिजे.
संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी म्हणाले, की लोककला आणि ललित कला अकादमीच्या माध्यमातून युवकांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देईल.
पं. विश्वनाथ दाशरथे यांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सुरुवातीला राग दुर्गा सादर केला. विलंबित एकताल आणि दृत एकतालाची बंदिश गाऊन त्यांनी दुर्गा राग नटवला. त्यानंतर मंदारमाला नाटकातील ‘सोहम हर डमरू बाजे’ हे सुरेख असे नाट्यगीत सादर केले.भैरवी रागातील सुंदर असे भजन गाऊन संगीत मैफिलीची सांगता झाली. या मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाला संवादिनीवर श्री. दिनेश सन्यासी यांनी साथ केली तर श्री. जय कराड यांनी तबल्यावर साथ दिली.
या संगीत मैफिलीस शहरातील संगीत रसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी माळी- उगले यांनी केले तर डॉ. मोहिनी रायबागकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button