ज्ञानराधा; तिरूमला ऑईलच्या या इमारतीला कोट्यावधींचा निधी आला कुठून? जालन्यातील ही इमारत आर्थिक गुन्हे शाखा गोठवणार?

जालना; “ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी” या अर्थ पुरवठा करणाऱ्या पतसंस्थेचा घोटाळा वाढतच चालला आहे. मराठवाड्यात ठिकठिकाणी या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुठे आणि इतरांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. जालन्यातही आर्थिक गुन्हे शाखेकडे सुमारे अडीच हजार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे आणि दोन वेळा सुरेश कुटे आणि त्यांचे सहकारी आशिष पाटोदेकर या दोघांना जालन्यात आणून न्यायालयात हजर ही केले होते.
काही दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्याच वेळी आर्थिक गुन्हे शाखेने सुमारे 40 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. आता जालन्यातील औद्योगिक वसाहत परिसर टप्पा क्रमांक तीन मधील सहा मजली इमारत गोठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे 2017 मध्ये सुरेश कुटे यांनी एक फार्म स्थापन केली, “तिरूमला एडिबल ऑइल “या नावाने या फॉर्मच्या नावावर औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक तीन समृद्धी महामार्गाला लागून आणि पारसी टेकडीच्या पायथ्याशी अशा मोक्याच्या ठिकाणी सुमारे अकरा हजार चौरस स्क्वेअर फुटाचे प्लॉट घेतले. या प्लॉटवर आज सहा मजली टोलेजंग इमारत उभी आहे. हे काम सुरू असतानाच ज्ञानराधा मल्टीस्टेट चा घोटाळा उघडकीस आला आणि सध्या या फर्मचे प्रमोटर आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आज या इमारतीचे काम आहे त्या स्थितीत अर्धवट आहे .एक कोटींचा प्लॉट, एक कोटींचा पाया आणि प्रत्येक मजल्याला एक एक कोटी अशी अंदाजीत कमीत कमी रक्कम धरली तर हीच प्रॉपर्टी आठ कोटींची होत आहे. या प्रॉपर्टी खरेदीला पैसा आला कुठून? हा महत्त्वाचा प्रश्न आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172