खरपुडी येथे सिडकोची आज जमीन मोजणी; राडा होण्याची शक्यता?
जालना -जालना तालुक्यात आणि जालना शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या खरपुडी शिवारातील जमीन सिडको प्रकल्पासाठी निश्चित झाली आहे. या अनुषंगाने गुरुवार दिनांक पाच रोजी या जमिनीची मोजणी होणार आहे. या प्रकल्पासाठी खरपुडी ग्रामस्थांचा कोणाचाही विरोध नाही आणि ग्रामस्थांनी देखील ही जमिनी दिलेली आहे. परंतु ठराविक लोकांच्याच जमिनीची मोजणीची मोजणी होणार असल्यामुळे उर्वरित ग्रामस्थांचा संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे. अशीच घटना काही वर्षांपूर्वी खरपुडीमध्ये झाली होती त्यावेळी मोजणी पथकाला ग्रामस्थांनी पिटाळून लावले होते.
जी जमीन मोजणी होणार आहे ती एका गटात असलेल्या सर्व शेतकऱ्यांची नव्हे तर ठराविक शेतकऱ्यांचीच होणार आहे .आणि ज्यांची जमीन मोजणी होणार आहे त्यामध्ये बहुतांशी जमीन ही व्यापाऱ्यांची आहे .त्यामुळे गावकऱ्यांचा असा आरोप आहे की, जमीन मोजताना एखाद्या गटात जेवढी जमीन संपादक केली आहे ती सर्व मोजून घ्यावी .परंतु तशी नोटीस सर्वांनाच मिळालेली नाही त्यामुळे जे गावकरी आहेत ते उद्या काय पावित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सिडको खरपुडी प्रकल्पांतर्गत मौजे खरपुडी तालुका जालना, जिल्हा जालना येथील गट नंबर 77, 82 ,83, 145 ते 154 आणि 157 ते 163, 165, 166 या गटांमधील ठराविक लोकांचीच जमीन मोजणी होणार आहे. या संदर्भात उपाधीक्षक भूमी अभिलेख जालना यांनी पत्र क्रमांक 4145 दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी ही नोटीस जारी केली आहे.मोजणी होणाऱ्या जमीन धारकांची नावे
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172