Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

शिक्षणाधिकारी आणि श्री चैतन्य टेक्नोच्या “शाळेचा” विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

जालना- शहरातील छत्रपती संभाजी नगर भागात जून 2024 मध्ये श्री चैतन्य टेक्नो स्कूल या नावाने एक शाळा उघडली. या शाळेला शासनाची कोणतीही परवानगी नाही तसेच या शाळेबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर ही शाळा अनाधिकृत असल्याचे निष्पन्न झाले.  त्या अनुषंगाने दिनांक 25 जुलै रोजी या शाळेला शिक्षण विभागाने सील ठोकले. यासंदर्भात ईडीटीव्हीने सविस्तर बातमी ही प्रकाशित केली होती.

सील ठोकून ही शाळा बंद करण्याचे आणि विद्यार्थ्यांना इतर शाळेमध्ये वळवण्याचे आदेश या शाळेच्या व्यवस्थापनाला दिला गेले. त्याचसोबत अनाधिकृत शाळा चालवल्याबद्दल एक लाख रुपये दंड आणि त्याही पुढे चालवली तर दर दिवशी दहा हजार रुपये दंड ही ठोकण्यात आला होता. हा दंड भरणे तर लांबच पण व्यवस्थापनाने पुन्हा ही शाळा सुरूच ठेवली. असे असताना या शाळेवर कारवाई करायचे सोडून शिक्षण विभागाने पुन्हा दिनांक 29 ऑगस्ट रोजी या शाळेला सील ठोकले. म्हणजे पहिल्यावेळी शिक्षण विभागाचा आदेश डावलून सील काढून शाळा चालवल्याबद्दल या शाळेवर कारवाई करणे तर दूरच उलट पुन्हा दुसऱ्यांदा सील ठोकले. असा एकाच शाळेला दोनदा सील ठोकण्याचा अजब प्रकार जालनेकरांना पाहायला मिळाल .हे सील ठोकल्यानंतर देखील ही शाळा आजही सुस्थितीत चालू आहे.

या शाळेवर कारवाई करायची कोणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सील लावताना गटशिक्षणाधिकारी श्रीमती असावरी  काळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. पुढील कारवाई करण्यासाठी श्रीमती काळे या वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ हे त्यांच्या वरिष्ठांची म्हणजेच शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची वाट पाहत आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन मागितले आहे. शिक्षण उपसंचालकांनी नुकतेच मार्गदर्शनही केले आहे. आणि तुमच्या स्तरावर निर्णय घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल त्वरित पाठवण्याचे सांगितले आहे. कारवाई करायची म्हणजे अनाधिकृत शाळा चालवल्याप्रकरणी या शाळेवर गुन्हा दाखल करायचा आहे. खरं तर हे काम शिक्षणाधिकारी देखील करू शकतात परंतु त्यांनी पुन्हा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे आणि उप संचालकांच्या पत्राची प्रत आपले पत्र जोडून गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले आहे आणि त्यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी असावरी काळे या आता कारवाई करतात का पुन्हा वरिष्ठांकडेच हे पत्र परत पाठवतात या याची प्रतीक्षा आहे.

सील लावल्यानंतर  आता दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे त्यामुळे शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापनाला वेगवेगळ्या युक्त्या काढून कारवाई करण्यासाठी टाळत तर नाही नाही ना,त्यांना वेळ तर देत नाही ना? एकीकडे  सील ठोकून या शाळेची बदनामी केलेली असताना दुसरीकडे कारवाई करण्यासाठी शिक्षणाधिकारी का मागे सरकत आहेत? या शाळेसोबत नरमाईची भूमिका का आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे शाळा व्यवस्थापनाने म्हणजेच शाळेच्या प्राचार्या आणि व्यवस्थापक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शाळेच्या परवानगीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर केल्याचे सांगितले आहे. याचा दुसरा अर्थ यांनी ही शाळा अनधिकृत असल्याचे ही मान्य केले आहे . सील ठोकले त्यादिवशी 180 विद्यार्थी होते आता या शाळेत दीडशे विद्यार्थी आहेत जर परवानगी नाही मिळाली तर या विद्यार्थ्यांच्या  “आयुष्याचाच खेळ” होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button