आरोपींना पकडण्यासाठी छ. संभाजीनगर पोलिस झाले जीवावर उदार
छत्रपती संभाजीनगर-आज दि.7 सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या (CSN) पोलिसांनी एक धाडसी कारवाई करून संपूर्ण राज्याला दाखवून दिले आहे की आम्ही देखील कमी नाहीत. घटना अशी घडली की, फीरोजपूर, पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत धोकादायक आरोपींना अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेत एका तरुण महिलेची, जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते, निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पळत होते.
पहाटे 3 वाजता अचानकच प्रविण पवार पोलीस आयुक्त यांचे मोबाइलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ADG श्री प्रमोद बान यांचा फोन आला. अत्यंत गंभीर आणि तातडीची मदत हवी होती. त्यांचे शब्द थरारक होते, त्यांच्या टीमकडे वेळ नव्हता, आणि संभाजीनगर शहरची टीम या मिशनसाठी आवश्यक होती. क्षणाचाही विलंब न करता पोलीस दलाने सर्व तयारी केली. आणि आरोपींचा मागोवा घेणे सुरू झाले.
MH-26-AC-5599 क्रमांकाची इनोव्हा—आरोपींनी भरधाव वेगाने पळवलेली! समृद्धी महामार्गावरून पळणाऱ्या त्या गाडीला सकाळी ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चक्रव्यूहात अडकवले! अत्यंत धाडसी योजना आखून स्थानिक गुण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे आणि सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील १० अधिकाऱ्यांच्या आणि ४० कर्मचाऱ्यांच्या टीम सर्व तयारीने सज्ज झाले. आरोपीं अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतानाही कोणताही गोळीबार किंवा जीवितहानी न होऊ देता बुलेटप्रूफ जॅकेट्समध्ये सज्ज जवानांनी या टोळीला पकडले आहे. अशा गंभीर परिस्थितीत गोळीबार देखील होऊ शकला असता परंतु पोलिसांनी आखलेली रणनीती आरोपींना पकडण्यात यशस्वी झाली.
ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटातली थरारक घटना वाटावी अशीच होती—श्वास रोखून धरावा लागेल अशी ती धाडसी मोहीम.पोलिसांना मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली, आणि शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच ताब्यात घेतलं.आता पंजाब पोलिस संभाजीनगर पोलिसांच्या सातत्याने संपर्कात आहेत, आणि आरोपींना आज संध्याकाळी त्यांच्या ताब्यात दिले जाईल. छत्रपती संभाजीनगरच्या या जिगरबाज पोलिसांनी दाखवून दिलं की आम्हीही मागे नाहीत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172