Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

अखेर अनाधिकृत असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल वर गुन्हा दाखल;पुढे काय?

जालना- शहरातील छत्रपती संभाजी नगर भागात एका जुन्या हॉटेलच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल वर अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये काल गुन्हा दाखल झाला. शिक्षण विभागाने वारंवार सुनावणी घेऊन, शाळेला नोटीस देऊन, दंड आकारून एवढेच नव्हे तर दोन वेळा सील ठोकूनही ही शाळा सुरूच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने कडक कारवाई करत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी जालना शहर डॉ. रवींद्र शंकरराव काकडे यांना आदेशित केले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009  18(5)तसेच भारतीय न्याय संगीता 2023 कलम 3(5) आणि 318(2) अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापक यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

niramy

nrg

सध्या सुमारे दीडशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात. चाळीस हजारांच्या पुढेच दरवर्षीची या विद्यार्थ्यांची फी आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे पालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. कारण यापूर्वी सील लागलेल्या, बातम्या अनाधिकृत शाळेच्या बातम्या, सर्वच माध्यमांनी प्रकाशित केल्यानंतर देखील या शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांना परवानगी मिळेल या आशेने थांबून ठेवले होते. परंतु अद्याप पर्यंत ही परवानगी मिळालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे काय या प्रश्नामुळे पालकांचेही धाबे दणाणले आहे?

dr chate

आता पुढे काय? 1)व्यवस्थापनाला त्वरित परवानगी आणणे अत्यावश्यक आहे, ती जर मिळाली नाही आणि शाळा सुरू ठेवली तर आणखी समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.2) या शाळेच्या विद्यार्थ्यांना दुसरी शाळा प्रवेश देऊ शकते .3) प्राप्त माहितीनुसार दुसऱ्या एका स्वयंअर्थसाहित शाळेच्या यु-डायस क्रमांकावर हे विद्यार्थी वळते करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. अशा वेळी व्यवस्थापन श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे असू शकते परंतु ज्या शाळेत हे विद्यार्थी भरती केले आहेत त्या शाळेचा शासन दरबारी असलेला पत्ता आणि सध्या भरत असलेल्या शाळेचा पत्ता एकच असावा लागतो. नाहीतर या शाळेसोबत ती शाळा देखील अडचणीत येऊ शकते. शाळेचा पत्ता बदल, शिक्षण विभागाला मान्य नाही आणि तो करायचा असेल तर त्यांना रीतसर परवानगी घेऊनच करावा लागतो.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button