Advertisment
Jalna Districtमराठवाडाराज्य

जालना मनपाचा अजब कारभार; झाडांच्या मुळांना माती सोडून दगड धोंड्यांचा भार!

जालना -शहर महानगरपालिकेतील कामांची नमुने हे काही जनतेला नवीन नाहीत. अशी निकृष्ट कामे करण्यासाठी आयुक्त, या कामांवर देखरेख करणारे अभियंते  हे लेखी संमती जरी देत नसले तरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि कदाचित कंत्राटदाराने तर काम निकृष्ट दर्जाचे करण्याची शपथ घेतलेली असते की काय? त्यांच्या या कामामुळे  सामान्य जनतेला फक्त संताप व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

niramy

nrg

marathavada mukti sangram din आता हेच पहा नं! उद्या 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती दिन, हैदराबाद संस्थानाच्या जुलमी राजवटीतून आपला मराठवाडा मुक्त झाला .त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. परंतु ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्या सभोवताली असलेला परिसर सुंदर करण्याच्या नावाखाली निकृष्ट दर्जाच्या मानसिकतेने सगळं काही पोखरून निघत आहे. जालना शहरातील जुना जालना भागात हुतात्मा स्मारक आहे ,या स्मारकाला वर्षभरात स्वच्छता आणि दुरुस्ती न करणाऱ्या महानगरपालिकेने गेल्या दोन दिवसांपासून काम सुरू केले आहे., आणि आता शेवटच्या घटकेत हे काम किती गुणवत्ता पूर्ण होईल याचा विचारच न केलेला बरा? आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी देखील सायंकाळपर्यंत इथे रंगरंगोटी आणि सुशोभीकरण सुरू होते. कहर म्हणजे इथे असलेल्या सुंदर झाडांना आळे केले आहे . ते कदाचित खत पाणी घालण्यासाठी, माती वाहून न जाण्यासाठी आणि ओलावा टिकवा या दृष्टीने केले असावे असे सर्वसामान्यांना वाटेल ,परंतु तसे नाही बर का! इथूनच काढलेले दगड माती धोंडे या झाडांच्या सभोवती टाकून झाडाची पुरती वाट लावल्या जात आहे. त्यामुळे वरून दिसणारे हे सुशोभीकरण आत मध्ये किती “पोखरल्या” गेल्या आहे त्याचा हा नमुना .दरवर्षी 17 सप्टेंबर साजरा होणार हे माहीत असताना देखील इथे टाकण्यात येणारा हिरवा गालीचा काल आणि आज  टाकण्यात आला आहे. आता या गालीच्या वर पाऊस पडेल कधी आणि ती हिरवळ नागरिकांना दिसेल कधी, त्याहीपेक्षा आता तर अशी शंका येत आहे की कदाचित या हिरवळीच्या खालीच जर झाडाला जसे दगड दगड धोंडे टाकले आहेत तसेच जर या हिरवळीच्या खाली टाकले असतील तर ते हिरवळीसाठी की उन्हाळ्यात वाळवंट दिसण्यासाठी?

जाऊ द्या पुन्हा पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर येणारच आहे, वर्षभर टिकेल एवढे गुणवत्ता पूर्ण काम केले तर पुढील वर्षी पुन्हा बिल काढणार कसे? या साखळीची घरे चालणार कशी? याचे उत्तर शोधण्यामध्ये सामान्य जनतेला एक वर्ष खर्च करावे लागणार आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button