दिनविशेष; आजही 172 स्वातंत्र्य सैनिकांना शासनाचे मानधन;किती मिळते?
जालना- हैदराबाद संस्थांच्या निजामी राजवटी मधून 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाड्याला मुक्ती मिळाली. खरंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला होता, परंतु त्यावेळी देश 565 संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यापैकी हैदराबाद ,काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली तरी हे तीन संस्थानातील लोक पारतंत्र्यातच होते. त्यावेळी हैदराबाद संस्थान पासून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी जनतेला दीर्घ लढा द्यावा लागला. अनेकांना आपले बलिदानही द्यावे लागले, तेव्हा कुठे निजामाने मराठवाड्याला हैदराबाद संस्थानांमधून मुक्त केले. अनेक स्वातंत्र्यसैनिक कारागृहात गेले , भूमिगत झाले,बलिदान दिल, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिन “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” म्हणून उत्साहात साजरा केला जातो .मराठवाड्यातील, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव मध्ये या दिनानिमित्त विशेष ध्वजारोहण करून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून सलामी दिल्या जाते.
जालना शहरांमध्ये जुना जालना भागामध्ये “हुतात्मा स्मारक स्तंभ” आहे.Marathawada mukti sangram din या स्तंभाचे अनावरण 17 सप्टेंबर 1999 रोजी करण्यात आले. या स्तंभावर सरदार वल्लभभाई पटेल, जनार्दन मामा नागपूरकर, राजाभाऊ वाकडे ,किसनसिंह तेजसिंह राजपूत ,जयवंतराव पाटील, पं. विनायकराव विद्यालंकार ,वामन नाईक, चंद्रगुप्त चौधरी, सु.कृ वैशंपायन, विनायकराव चारठाणकर ,दिगंबरराव बिंदू ,मुकुंदराव पेडगावकर, गोविंदराव नानल, पं. श्यामलाल, दत्तात्रय उत्तरवार, जानकीलाल राठी, शंकरराव जाधव, वसंतराव राक्षस भुवनकर ,विश्वनाथ शिंदे, आदींची कोरीव छायाचित्रे आहेत.
जिल्ह्यामध्ये आजही 172 स्वातंत्र्य सैनिक शासनाचे मानधन घेत आहेत. marathawada liberation dayराज्य शासनाच्या वतीने या 172 स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा वीस हजार रुपये मानधन दिल्या जाते. तसेच यापैकीच 35 स्वातंत्र्य सैनिकांना केंद्र शासनाचे 20हजार रुपये मानधन मिळत आहे. असे एकूण 35 स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे प्रत्येकी 20 हजार रुपये म्हणजेच दरमहा चाळीस हजार रुपये मानधन मिळत आहे .संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हुतात्म्यांना पुष्प चक्र अर्पण करून उपस्थित असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेऊन त्यांचा सन्मान करतात.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172