गरिमा रियल इस्टेट फसवणुकीतील मुख्य सूत्रधाराला सहा वर्षानंतर जामीन; गुंतवणूक परत मिळण्याच्या अशा पल्लवीत
जालना सध्या गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या घोटाळ्याप्रमाणेच सन 2017 -18 मध्ये अशाच प्रकारचा रियल इस्टेटमध्ये घोटाळा झाला होता .राजस्थान मधील तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी एकत्र येत महाराष्ट्रातील वर्धा छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी ,आणि जालना या भागातील गुंतवणूकदारांना लुटले होते. कोट्यावधी रुपयांचा हा घोटाळा होता. गरीमा रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी होती.
सन 2010 ते 15 दरम्यान जालना जिल्ह्यात राजस्थान येथील धोलपूर जिल्ह्यात असलेल्या बनवारीलाल माधवसिंह कुशवाह यांनी त्याचे नातेवाईक शिवराम माधवसिंह कुशवाह, बालकिशन माधवसिंह कुशवाह, शोभाराणी बनवारीलाल कुशवाह, बनवारीलाल हरिभाऊ लोधी, जितेंद्र कुमार रामनाथ कुशवाह, विजेंद्र पालसिंग लोधी ,आणि धीरज गुलाब सिंह पाटील यांच्या मदतीने सन 2007 -08 मध्ये गरिमा रियल इस्टेट अँड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. सन 2011- 12 मध्ये साथी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी ही आणखी एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचे धीरज पाटील वगळता सर्व जण काही दिवस संचालक म्हणून काम करत होते . धीरज पाटील हे महाराष्ट्रातील व्यवसायासाठी जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत होते. छत्रपती संभाजी नगर येथील द्वारकापुरी, स्टेशन रोड बन्सीलाल नगर, येथे मोहन श्रीनिवास मोहोळकर यांच्या मालकीच्या इमारतीत बत्तीस हजार रुपये महिना प्रमाणे भाडेतत्त्वावर कार्यालय देखील सुरू केले होते .या कार्यालयात बसून धीरज गुलाबसिंग पाटील रा. अथर्व, अशोक नगर जळगाव हे जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील जनतेला वेगवेगळ्या योजना सांगून एजंट मार्फत गुंतवणूक करत होते .गुंतवणुकीच्या बदल्यात महाराष्ट्रात कुठेही प्लॉट देण्याचे आमिष त्यांनी दाखविले. आणि बनावट इसार पावती देखील ते करत होते .या गुंतवणुकीमध्ये छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, परभणी, आदी ठिकाणी जमा झालेली रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जात होती .गुंतवणुकीतून जमा झालेली रक्कम आरोपी शिवराम माधवसिंह कुशवाह व बालकिशन माधवसिंह कुशवाह यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका अंतर्गत मौजे कोंडवे येथे स्वतःच्या नावावर शेतजमीन खरेदी केली तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी बनवारीलाल कुशवाह यांनी त्याचा मित्र गोरेलाल कुशवाह व लहान भाऊ मखनलाल कुशवाह यांच्या नावावर देखील मौजे कोंडवे येथे शेतजमीन खरेदी केली. दरम्यान ज्यावेळी गुंतवणूकदारांचे पैसे किंवा प्लॉट देण्याची वेळ आली आणि गुंतवणूकदारांनी तगादा लावला त्यावेळेस त्यांचे पैसे मिळाले नाहीत. एवढेच नव्हे तर प्लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी एका सोबत दुसरा आणखी एखादा ग्राहक आणला तर त्याला दोन टक्के कमिशन ही मिळायचे. त्यामुळे लवकरच हा धंदा वाढत गेला. सण 2018 मध्ये महाराष्ट्रातील वर्धा, छत्रपती संभाजी नगर, रत्नागिरी, जालना या ठिकाणी फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झाले आणि या सर्व गुन्ह्यांची एकत्रित सुनावणी छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे. जालना जिल्ह्यात 1712 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती आणि याचा तपास जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. 1712 गुंतवणूकदारांची 4 कोटी 81 लाख 27 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बनवारीलाल माधवसिंह कुशवाह याला दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळ पासून बनवारीलाल सुरुवातीला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी अशा गेल्या सहा वर्षांपासून न्यायालयाच्या ताब्यात आहे. आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथील न्यायालयाने कुशवाहाला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कुशवाह याची पोलिसांनी 2018 मध्ये गोठवलेल्या 200 कोटींच्या मालमत्तेची किंमत आज दुप्पट झाली असेल आणि या गुंतवणुकीची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा युक्तिवाद वकिलाने केल्यामुळे न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172